मुंबई : मुंबईत गुरु माँ म्हणून वावरणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाचा पर्दाफाश झाला आहे. ही व्यक्ती मागील ३० वर्षांपासून मुंबईत बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होती. या व्यक्तीच्या घरी शेकडो भक्त दर्शनासाठी यायचे आशीर्वाद घ्यायचे. या व्यक्तीचे खरे नाव 'बाबू अयान' असून, त्याने स्वतःला भारतीय नागरिक म्हणून दाखण्यासाठी बनावट जन्माचा दाखला, आधार आणि पॅन कार्ड तयार करून घेतले होते. ही कागदपत्र पोलिसांनी तपासणीसाठी पाठवल्यावर हे धक्कादायक सत्य समोर आले.
गुरु माँ म्हणून वावरणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाने श्रद्धेच्या नावाखाली सुमारे ३०० अनुयायींकडून पैसे घेऊन मुंबईतील गोवंडी भागात तब्बल २० घरे खरेदी केली. याच घरांमध्ये धार्मिक विधी व आशीर्वाद सत्रे (सत्संग / प्रवचन) सुरू होती. भाविक 'गुरु माँ'च्या खोट्या दिव्यशक्तीवर विश्वास ठेवून भरघोस दान करत होते.
पोलिस कारवाईत काय आढळलं ?
एटीसएस युनिटने २४ मार्चला रफीक नगर या भागात छापा टाकला असताना, ८बांग्लादेशी ट्रान्सजेंडर व्यक्तीना अटक केली. पण या गुरु माँ ने भारतीय असल्याचा दावा करत बनावट कागदपत्रे पोलिसांना दाखवली. आणि पुढील तपासातून सत्य बाहेर आले. गुरु माँ विरूद्ध पासपोर्ट कायदा १९५०, फॉरेनर्स ऑर्डर १९४८, फॉरेनर्स अॅक्ट १९४६आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत (BNS) गुन्हे दखल झाले आहेत. शिवाजी नगर, नर्पोली, देवनार, ट्रॉम्बे आणि कुर्ला ठाण्यांमध्ये तिच्याविरोधात याआधीच गुरु माँ विरोधात पाच गुन्हे नोंदवले होते.