वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया ठरला पहिला संघ, बांगलादेशला केले पराभूत

मुंबई: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात, ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा १० गडी राखून पराभव करत सेमीफायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे.


बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. बांगलादेशचा संघ ५० षटकांत ९ गडी गमावून १९८ धावा करू शकला.बांगलादेशसाठी शोभना मोस्तरीने सर्वाधिक नाबाद ६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अलाना किंग, जॉर्जिया वेअरहॅम, ऍशले गार्डनर आणि ऍनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.


१९९ धावांचे माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी बांगलादेशी गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. कर्णधार ऍलिसा हिली आणि फोबी लिचफिल्ड यांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाला अवघ्या २४.५ षटकांत विजय मिळवून दिला. एलिसा हिली हिने अत्यंत aggressive फलंदाजी करत आपले सलग दुसरे शतक पूर्ण केले आणि ७७ चेंडूंत नाबाद ११३ धावा केल्या. तिच्या खेळीत २० चौकारांचा समावेश होता.


फोबी लिचफिल्डने देखील तिला उत्कृष्ट साथ दिली आणि ७२ चेंडूंत नाबाद ८४ धावा केल्या. हीली आणि लिचफिल्ड यांच्यातील २०२ धावांची नाबाद सलामी भागीदारी ही महिला विश्वचषकाच्या इतिहासातील गडी न गमावता यशस्वीरित्या गाठलेले सर्वाधिक मोठे लक्ष्य ठरले.


या दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात आपले वर्चस्व कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Comments
Add Comment

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड