मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर माणुसकीचं दर्शन! प्रसूती वेदनांनी व्याकूळ महिलेला एका तरुणाने दिला मदतीचा हात

मुंबई: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्थानकांवर प्रसूती होण्याच्या अनेक घटना घडतात. पण राममंदिर रेल्वे स्थानकावर नुकत्याच घडलेल्या घटनेत, एका तरुणाने दाखवलेल्या असामान्य धाडसामुळे एका महिलेची सुरक्षित प्रसूती झाली.


एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास सुरू असतानाच तिला अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. वेदना असह्य झाल्याने महिलेने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. ट्रेन राममंदिर स्टेशनवर पोहोचताच इतर प्रवाशांनी महिलेला प्लॅटफॉर्मवर खाली उतरवले.


याच वेळी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या एका तरुणाने ही गंभीर परिस्थिती पाहिली. त्याने जराही वेळ न घालवता महिलेला मदत करण्याचा निर्णय घेतला. या तरुणाने तातडीने आपल्या डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला. मैत्रिणीच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार, या तरुणाने तिथे उपस्थित असलेल्या महिला प्रवाशांच्या मदतीने प्लॅटफॉर्मवरच महिलेची प्रसूती केली.


तरुण आणि सहप्रवाशांच्या मदतीने महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसूती झाल्यानंतर तत्काळ याची माहिती रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.


रेल्वे पोलिसांनी त्वरित रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि आई व नवजात बाळाला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


संकटाच्या वेळी अनोळखी महिलेला धाडसाने मदत करणाऱ्या या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेमुळे मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडले.

Comments
Add Comment

मेट्रो प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्य सरकार दरवाढीच्या तयारीत

मुंबई : रेल्वे प्रमाणे मेट्रोलाही मुंबईकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मुंबईत २०१४ पासून सुरू झालेले

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत

मुंबई : आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर

मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूरमधील नागरिकांना धो धो पाणी, चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय जलबोगदा महिना अखेर होणार कार्यान्वित

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलशयापर्यंतच्या

भीम यूपीआयद्वारे 'मुंबई वन' तिकिटांवर २० टक्के सवलत

एमएमआरडीएकडून ३१ डिसेंबरपर्यंत ऑफर मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यांच्या

आज मध्यरात्री कल्याण-बदलापूर दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री कल्याण आणि बदलापूर दरम्यान चार ठिकाणी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई, विदर्भ,मराठवाड्यात थंडीची चाहूल

राज्यभरात तापमान कमी होणार मुंबई  : राज्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसाने