दिवाळीत कोणत्या दिवशी, कोणता सण जाणून घ्या एका क्लिकवर!

घराची संपूर्ण स्वच्छता, चमचमणारे लायटिंग, फराळ, नवीन कपडे, रंगीबेरंगी कंदील आणि पणत्यांनी घर उजळायची वेळ आली आहे. अर्थात सणांचा राजा दिवाळी अवघ्या काहीच दिवसांवर येवून ठेपला आहे. दिवाळी हा मुळात पाच दिवसांचा सण आहे. मात्र यावर्षी दिवाळीमध्ये एक दिवस अधिक आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसणार आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व आहे आणि ते साजरे करण्याच्या पद्धतीसुद्धा वेगळ्या आहेत. या दिवसांमध्ये नेमकं कोणत्या दिवशी, काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हि माहिती नक्की वाचा!


दिवाळीचा पहिल्या दिवसाला वसुबारस म्हणतात. हिंदू संस्कृतीमध्ये गायीला फार पवित्र मानले जाते. या दिवशी घरातील गायींना स्नान घालून नंतर सजवले जाते, त्यांची पूजा केली जाते. तसेच त्यांना नैवेद्य दाखवला जातो. गायीचे पूजन केल्याने घरातील संकट, नकारात्मक शक्ती दूर होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे गायीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार यावर्षी १७ ऑक्टोबरला वसुबारस आहे.


दिवाळीतील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी! हा दिवस व्यापारी वर्गासाठी विशेष असतो. धनत्रयोदशीला व्यापारी आपल्या उद्योगधंद्यामध्ये वाढ व्हावी आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी यासाठी दुकानांमध्ये कुबेराची पूजा करतात. सोन्या, चांदीचे नवीन दागिने बनवणे, नवीन वस्तू विकत घेणे यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. यावर्षी १८ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे.


दिवाळी खऱ्या अर्थाने ज्या दिवशी सुरू होते तो दिवस म्हणजे नरकचतुर्दशी! हा दिवस दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी येतो. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून अनेक लोकांना त्रासापासून मुक्त केले म्हणून हा दिवस साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे वाईटातून चांगल्या दिशेकडे असा संकेत या दिवसातून मिळतो. यादिवशी पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी आपल्या घरातील फराळ जवळच्या व्यक्तींना वाटला जातो. यावर्षी २० ऑक्टोबरला नरक चतुर्दशी असून अभ्यंगस्नानासाठी ५ वाजून २४ मिनिटांचा मुहूर्त आहे.


दरवर्षी लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्थी एकाच दिवशी असतात. मात्र यावर्षी लक्ष्मीपूजन नरक चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आले आहे. लक्ष्मीपूजनला फुलांची आरास करुन त्यामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते. घरात धनधान्य, पैसा, समृद्धी टिकून राहावी म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते. यावर्षी २१ ऑक्टोबरला हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.


यानंतर दिवाळीच्या पाचव्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा केला जातो. या दिवसाला बालिप्रतिपदासुद्धा म्हणतात. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते आणि पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. दिवाळीतील हा दिवस पतीपत्नीसाठी खास असतो. यावर्षी हा दिवस २२ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.


दिवाळीतील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज! बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक आणि त्यांच्यातील स्नेह वाढण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते आणि ते एकमेकांना भेट देतात. यावर्षी हा दिवस २३ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषणात वाढ

मुंबई (वार्ताहर) : मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढत असून, धुके आणि धूलिकणांमुळे यात आणखी भर

महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या तारखेत बदल !

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८

मुंबईतील दहिसरमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे धोका टळला !

मुंबई : राजधानी मुंबईतील दहिसर पूर्वेकडील आनंदनगर परिसरात आज मोठी आग लागली. दहिसर येथील एका उंच इमारतीत ही आग

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात पालकमंत्री नितेश राणेंची एन्ट्री

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुध्द शहर विकास आघाडी अशी लढत आहे. निवडणुकीचे वातावरण

रेल्वे स्थानकावर भीक मागणाऱ्या मुलीचा शारीरिक सुखासाठी वापर अन् खाडीत आढळला मृतदेह! डोंबिवलीतील धक्कादायक घटना उघड

ठाणे : डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पलावा सिटीसमोरील खाडीमध्ये तीन दिवसांपूर्वी एका

शरद पवार गटाच्या सूर्यकांत मोरेंकडून विधिमंडळ सभागृहाचा अवमान

मुंबई : शरद पवार गटाचे सूर्यकांत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे झालेल्या सभेत