Wednesday, October 15, 2025

TKM Sustainability Report: टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून सस्‍टेनेबिलिटी रिपोर्ट २०२५ सादर

TKM Sustainability Report: टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून सस्‍टेनेबिलिटी रिपोर्ट २०२५ सादर

मुंबई:टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (TKM)ने आपला सर्वसमावेशक सस्‍टेनेबिलिटी रिपोर्ट २०२५ (Inclusive Susitanable Report 2025) अहवालाची घोषणा केली आहे.पर्यावरणीय स्थिरता आणि भारतातील विकासात्‍मक क्षेत्रासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या शाश्वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍सप्रती आपली कटिबद्धता बळकट करण्याचे प्रयत्न कंपनीने सुरू केल्याचे पुढे येत आहे.

टोयोटाचा सस्‍टेनेबिलिटी रिपोर्ट २०२५ पर्यावरणीय स्थिरता, सामाजिक जबाबदारी आणि प्रशासनासंबंधित प्रमुख उपक्रमांना निदर्शनास आणतो. 'टीकेएम कार्बन तटस्‍थतेप्रती (Carbon Neutralisation) परिवर्तनाला गती देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे,ज्‍या साठी उत्‍पादनांच्‍या पलीकडे जात आहे, उत्‍पादन कार्यसंचालनांमध्‍ये आणि संपूर्ण मूल्‍य साखळीमध्‍ये शाश्वत पद्धतींचा अवलंब करत आहे.' असे कंपनीने अहवालाच्या उद्घाटनप्रसंगी म्हटले.

भारतातील वेगाने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे कार्बन डायऑक्‍साइड उत्‍सर्जन मोठ्या प्रमाणात होत आहे. या समस्‍येचे निराकरण करण्‍यासाठी टीकेएमने एक्सइव्ही पोर्टफोलिओचा विस्तार करून बहुमार्गीय इलेक्ट्रिफिकेशन दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे, ज्यामध्ये स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल्‍स (एसएचईव्‍ही), बॅटरी इलेक्ट्रिक वेईकल्‍स (बीईव्‍ही), फ्युएल सेल इलेक्ट्रिक वेईकल्‍स (एफसीईव्‍ही),प्लग-इन हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल्‍स (पीएचईव्‍ही) तसेच पर्यायी इंधन संचालित वेईकल पॉवरट्रेन यांचा समावेश आ हे.

स्‍थानिक पातळीवर हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करत कंपनी भारतातील वैविध्‍यपूर्ण आर्थिक क्षेत्रात शुद्ध गतीशीलता किफायतशीर व सहजसाध्‍य करत आहे, तसेच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्‍स-फ्यूएल वेईकल्‍स (ईएफएफव्‍ही) विकसित करत आहे, ज्‍या भारताच्‍या जैवइं धन एकीकरण ध्‍येयांची पूर्तता करतात.

भारतातील गुंतागूंतीचे पुरवठा साखळी नेटवर्क व लॉजिस्टिक्‍स पायाभूत सुविधा वेईकल जीवनचक्रादरम्‍यान कार्बन उत्‍सर्जनांसाठी कारणीभूत ठरत असल्‍याचे ओळखून टीकेएमने सर्वसमावेशक हरित पुरवठा साखळी उपक्रमांसह कडक पुरवठादार ईएसजी अनुपालन आवश्‍यकतांची (Regulatory Requirements) अंमलबजावणी केली आहे. टीकेएमचे इको-डिलरशिप नेटवर्क ग्राहक टचपॉइण्‍ट्समध्‍ये पर्यावरणावरील परिणाम कमी करतात, तसेच हरित लॉजिस्टिक्‍स कार्यसंचालने संपूर्ण मूल्‍य साखळीमध्‍ये परिवहना शी संबंधित उत्‍सर्जन कमी करतात.

भारतातील औद्योगिक उत्‍पादन क्षेत्र जीवाश्‍म इंधनावर आधारित ऊर्जेवर अधिक प्रमाणात अवलंबून असल्‍याचे ओळखत टीकेएमने सर्व उत्‍पादन कार्यसंचालनांमध्‍ये १०० नवीकरणीय ग्रिड इलेक्ट्रिसिटी संपादित केली आहे. कंपनी २०३५ पर्यंत कार्बन-तटस्‍थ उत्‍पा दन कार्यसंचालनांप्रती, तसेच २०५० पर्यंत संपूर्ण मूल्‍य साखळीमध्‍ये शून्‍य कार्बन डायऑक्‍साइड उत्‍सर्जन संपादित करण्‍याप्रती कटि‍बद्ध आहे. कंपनी ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानांचा देखील अवलंब करत आहे, जे दरवर्षाला विशिष्‍ट ऊर्जा वापर कमी करतात.

टीकेएमने रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि जल पुनर्चक्रण यंत्रणेच्‍या माध्‍यमातून ८९.३ टक्‍के पाण्याची आवश्यकता पूर्ण केली आहे. भारतातील भूजल पातळी कमी होण्‍यासह उद्योगासाठी पाण्‍याची मागणी वाढत असल्‍यामुळे हा उत्तम उपक्रम आहे. झीरो-लिक्विड डिस्‍ चार्ज फॅक्‍टरीमुळे औद्योगिक पाणी दूषित होण्यास प्रतिबंध होतो. याविषयी अधिक माहिती देताना टीकेएम सामुदायिक पाणलोट प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि पाणी साठवण्‍यासाठी खोदण्‍यात आलेल्‍या खड्ड्यांच्‍या माध्‍यमातून वापरल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा जा स्त पाण्‍याचा साठा होण्‍याची खात्री देते असे कंपनीने म्हटले.

भारतातील मर्यादित पुनर्वापर पायाभूत सुविधांसह मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि ग्राहकांच्‍या वापरानंतर कचरा निर्मितीचा सामना करताना टीकेएमने सर्व उत्पादन प्रकल्पांम ध्ये झीरो वेस्‍ट-टू-लँडफिल दर्जा प्राप्‍त केला आहे.कंपनी व्यापक ३आर (रेड्यूस, रियु ज, रिसायकल) अंमलबजावणीद्वारे ९६% पेक्षा जास्त कचरा पुनर्वापर दर राखते. कंपनी सक्रिपणे भारताच्‍या वेईकल स्‍क्रॅपेज पॉलिसीला पाठिंबा देते, जेथे एण्‍ड-ऑफ-लाइफ वेईकल्‍ससाठी अधिकृत रिसायकलिंग चॅनेल्‍स निर्माण केले आहेत, तसेच उत्‍पादन व ग्रा हक वापरानंतरच्‍या टप्‍प्‍यांमध्‍ये चक्रिय अर्थव्‍यवस्‍था उपक्रमांसाठी सज्‍ज आहे.

Comments
Add Comment