Stock Market Update: शेअर बाजारात वाढ ! सेन्सेक्स निफ्टी 'इतक्याने' उसळला जागतिक वातावरण वाढीस पुरक

मोहित सोमण:जागतिक पातळीवरील काल संमिश्रित कामगिरीनंतर आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी शेअर बाजारात तेजी दिसत आहे. सेन्सेक्स ३३३.४६ अंकाने व निफ्टी ८६.९५ अंकाने वाढला आहे. विशेषतः जागतिक पातळीवरील कालच्या फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याच्या संकेतानंतर जागतिक सकारात्मक चित्र दिसत असताना भारतीय शेअर बाजारात मजबूत फंडामेंटलमुळे तेजी आणखी दिसत आहे. आज प्रामुख्याने खाजगी बँक (०.१०%) वगळता इ तर क्षेत्रीय विशेष निर्देशांकात वाढ झाली आहे. रिअल्टी (१.१८%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.०२%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (२.२६%), तेल व गॅस (०.३२%), मिडकॅप सिलेक्ट (०.८५%) निर्देशांकात वाढ झाली आहे.


सकाळी गिफ्ट निफ्टीतील वाढीसह आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात जकार्ता कंपोझिट (१.०६%) वगळता इतर सर्व निर्देशांकात वाढ दिसून आली ज्यामध्ये सर्वाधिक वाढ कोसपी (१.९९%), सेट कंपोझिट (०.७२%), निकेयी २२५ (१.३१%), सेट कंपो झिट (०.७४%) निर्देशांकात वाढ झाली आहे.सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ आज परसिस्टंट सिस्टिम (६.५९%), आयसीआयसीआय लोंबार्ड (६.३१%), न्यूजेन सॉफ्टवेअर (६.२१%), टाटा कम्युनिकेशन (३.५१%), बँक ऑफ महाराष्ट्र (३.५०%), अनंत राज (३.३५%),शिंडलर (३.०७%), कोफोर्ज (२.७७%), गोदरेज प्रोपर्टी (२.७४%), फिनिक्स मिल्स (२.१०%), वन ९७ (१.९०%), सिग्नेचर ग्लोबल (१.८३%), क्रिसील (१.७८%), वारी एनर्जीज (१.७०%), एल टी फायनान्स (१.६७%) समभागात झाली आहे.


सुरूवातीच्या कलात सर्वाधिक घसरण आज टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (३.८८%), सी ई इन्फोसिस्टिम (२.३२%), हिताची एनर्जी (१.९३%), ज्युबीलंट इनग्रेव्ह (१.८७%), कजारिया सिरॅमिक्स (१.६६%), उषा मार्टिन (१.३६%), बिकाजी फूडस (१.२६%), टेक म हिं द्रा (१.२१%), जेके सिमेंट (१.२०%), आयटीआय (१.१४%), गोदरेज इंडस्ट्रीज (०.९८%), रिलायन्स पॉवर (०.९३%), वेलस्पून लिविंग (०.८९%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment

Ratnagiri News : धर्मस्थळाला काळिमा! रत्नागिरीतील आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; अन्य पीडितांची शक्यता

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये (Khed, Ratnagiri) एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे,

Hyundai Investments 2030: ह्युंदाई मोटर इंडियाकडून ४०००० कोटींची गुंतवणूक जाहीर

मुंबई:आज ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (HMIL) ने त्यांच्या पहिल्याच गुंतवणूकदार दिनाचे आयोजन केले होते ज्यामध्ये

भारतीय अर्थव्यवस्थेतील जीडीपी वेग वाढणार - IMF

प्रतिनिधी:आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund IMF) संस्थेने आपला 'वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक (WEO) अहवाल जाहीर केला आहे.

महाराष्ट्रात मतदार याद्या अपडेट करण्यासाठी SIR होणार ?

मुंबई : बिहारमध्ये मतदार यादी सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाने सखोल मतदार यादी तपासणी प्रक्रिया अर्थात Special Intensive Revision

महापालिकेच्या ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी, गुरुवार १६ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू

मुंबई (खास प्रतिनिधी) : विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६

आयटी क्षेत्रातील धक्कादायक बातमी! पुन्हा एकदा आयटीत मरगळ येणार अमेझॉन करणार मोठी कर्मचारी कपात

प्रतिनिधी:आयटी क्षेत्रातील धक्कादायक बाब समोर आली आहे. एका जागतिक अहवालानुसार, अमेझॉन या जागतिक दर्जाच्या