मुंबई : राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) एसटी बँकेच्या (ST Bank) संचालक मंडळाच्या बैठकीत आज मोठा गोंधळ आणि तुफान राडा झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीदरम्यान, शिवसेना (शिंदे गट) आणि सदावर्ते गट यांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली, ज्याचे रूपांतर अखेरीस हाणामारीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत अपमानास्पद भाषा वापरल्यामुळे तसेच बँकेतील कथित भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून हा संघर्ष उफाळून आला. या राड्यामुळे बँकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर आता दोन्ही गटांकडून नागपाडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. एसटी बँक संचालक मंडळातील या हाणामारीमुळे मुंबईतील राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
'रेकॉर्डिंग'च्या वादातून हाणामारी
एसटी बँकेच्या (ST Bank) संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या राड्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळे या घटनेचे नाट्यमय स्वरूप उघड झाले आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, बैठकीत सुरुवातीला एक संचालक उभे राहून सक्त ताकीद देत आहेत. ते म्हणत आहेत की, "ही संचालक मंडळाची बैठक आहे. या बैठकीचे कोणीही रेकॉर्डिंग करू नये, तसेच या बैठकीचा आऊटपूट बाहेर जाता कामा नये, असे आक्षेपार्ह वर्तन कुणीही करू नये." मात्र, या इशाऱ्यानंतरही हा गोंधळ थांबला नाही आणि बैठकीत तात्काळ मोठा राडा सुरू झाला. संचालक एकमेकांकडे हातवारे करून भांडू लागले. हाणामारी वाढल्यानंतर त्यांनी एकमेकांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकण्यास सुरुवात केली. या अत्यंत हिंसक हाणामारीत एकनाथ शिंदे-आनंदराव अडसूळ यांच्या संघटनेचे (शिंदे गट) ४ ते ५ संचालक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 'भ्रष्टाचार' आणि 'अशोभनीय भाषा' यांसारख्या गंभीर मुद्द्यांवरून झालेला हा राडा एका प्रतिष्ठित सहकारी बँकेच्या इतिहासातील अत्यंत लाजीरवाणी घटना मानली जात आहे.
'शिंदे-अडसूळ' आणि 'सदावर्ते' गट थेट पोलीस ठाण्यात
आज सकाळी एसटी बँकेच्या (ST Bank) संचालक मंडळाची बैठक सुरू असतानाच हा गंभीर राडा झाला. या बैठकीला सदावर्ते यांच्या पॅनलचे (Sadaavarte Panel) सर्व संचालक आणि शिवसेना अडसूळ पॅनलचे संचालकही उपस्थित होते. या हाणामारीच्या मुळाशी एक अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आरोप असल्याचे समोर आले आहे. अडसूळ पॅनलच्या संचालकांनी, सदावर्ते यांच्या पॅनलमधील संचालकांनी बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केले, असा गंभीर आरोप केला. याच आरोपानंतर बैठकीत प्रचंड तणाव वाढला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या मोठ्या राड्यानंतर दोन्ही गटांनी त्वरित नागपाडा पोलीस ठाण्यात (Nagpada Police Station) धाव घेतली आहे. सध्या पोलिसांकडून दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदवून घेण्याची आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहकारी बँकेच्या संचालक मंडळात झालेल्या या मारहाणीमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक विकी कौशल (Vickey Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच आईबाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघांनी ...
एसटी बँकेच्या बैठकीत 'जातीवाचक शिवीगाळ' झाल्याचा गंभीर आरोप
या घटनेच्या संचालकाने दिलेल्या माहितीनुसार, आज बँकेतील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनससंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, बैठकीत उपस्थित असलेल्या काही विरोधी संचालकांनी आक्षेपार्ह वर्तन करत, 'आमच्या महिलांचा अपमान केला'. हा वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या संचालकांनी 'महिलांचे कपडे फाडले, मंगळसूत्र तोडले आणि जातीवाचक शिवीगाळ' देखील केली, असा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या गंभीर आरोपांमुळेच हाणामारीचा मोठा वाद निर्माण झाला. एका संचालकांनी स्पष्ट केले की, 'त्या विरोधी संचालकांकडून वारंवार महिलांचा अपमान होत असल्याने, या वेळी हा राडा झाला.' या संपूर्ण प्रकरणाची फिर्याद (FIR) देण्यासाठी आम्ही आता पोलीस ठाण्यात आलो आहोत, असेही त्यांनी सांगितले. महिलांचा अपमान आणि जातीवाचक शिवीगाळ यांसारख्या गंभीर आरोपांमुळे या घटनेचे स्वरूप केवळ राजकीय वादापुरते मर्यादित न राहता, आता ते कायद्याच्या चौकटीत अधिक गंभीर बनले आहे.