सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती, पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योग यांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसवणे, तसेच मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी कोल्ड स्टोरेज यंत्रणा कार्यान्वित करणे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंबंधी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सदर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या 'महाप्रीत'या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत त्यांना महत्त्वाच्या सूचनाही राणे यांनी केल्या.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) या संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री राणे यांनी चर्चा केली. सौर ऊर्जेवरील या यंत्रणा कार्यान्वित करणे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांची कामे ‘महाप्रीत’च्या माध्यमातून जलद आणि दर्जेदाररित्या पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या बैठकीस महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

महापालिकेच्या ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी, गुरुवार १६ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू

मुंबई (खास प्रतिनिधी) : विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६

सोशल मीडियातील चूक 'येवले अमृततुल्य'ला भोवणार ?

मुंबई : 'येवले अमृततुल्य' या चहाच्या कंपनीने त्यांच्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी विनापरवानगी

मेट्रो १ ताब्यात घेण्याच्या एमएमआरडीएच्या हालचाली

मार्गिकेचे सखोल निरीक्षण करणार मुंबई : मुंबईतील सर्वात पहिली मेट्रो १ (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) ताब्यात

म.रे.च्या स्टेशन्सवर १६ ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद

मुंबई (प्रतिनिधी): दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने निवडक प्रमुख

डोंबिवली स्थानकात पुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी विशेष ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकात १२ मीटर रुंद पादचारी पूलाच्या (एफओबी) गर्डर लॉचिंगसाठी अप

म्युनिसिपल मुंबई संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी महापालिका मुख्यालयावर या मागणीसाठी धडकणार मोर्चा

मुंबई (खास प्रतिनिधी) : महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान अर्थात बोनस तसेच जुनी पेन्शन