मुंबई : भारतीय परंपरेनुसार दिवाळीचा शुभारंभ धनत्रयोदशी या विशेष दिवशी होतो. यावर्षी हा दिवस शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी धन्वंतरी समुद्रमंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले, असा पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे या दिवशी त्यांची आणि महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते.
धनत्रयोदशी हा केवळ पूजेचा नाही, तर शुभ खरेदीसाठी अतिशय योग्य दिवस मानला जातो. विशेषतः राशीनुसार विशिष्ट वस्तूंची खरेदी केल्यास ती अधिक शुभ ठरते आणि आयुष्यात सौभाग्य, आरोग्य व आर्थिक समृद्धी आणते, असा विश्वास आहे. जाणून घ्या तुमच्या राशीला कुठली खरेदी शुभ ठरेल!
मेष (Aries)
पितळी भांडी, चांदीची नाणी किंवा दागिने खरेदी करा. यामुळे आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल.
वृषभ (Taurus)
सोने व हिऱ्याचे दागिने विकत घेणे अत्यंत शुभ ठरेल. दीर्घकालीन संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होईल.
मिथुन (Gemini)
पितळी भांडी किंवा पाचू रत्न खरेदी करा. यामुळे मानसिक शांती आणि व्यवसायात यश मिळेल.
कर्क (Cancer)
पितळ अथवा मातीच्या लक्ष्मी-गणेश मूर्ती विकत घ्या. घरात सौख्य आणि समाधान येईल.
सिंह (Leo)
सोन्याचे दागिने खरेदी केल्यास वैभव आणि लक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल.
कन्या (Virgo)
पूजेचे साहित्य व पितळी भांडी खरेदी करा. घरातील आरोग्य आणि स्वच्छतेत वाढ होईल.
तुळ (Libra)
चांदीच्या मूर्ती, पायातील चांदीच्या अंगठ्या खरेदी केल्यास विवाह जीवनात गोडवा आणि आर्थिक समृद्धी मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
झाडू, भांडी किंवा सजावटीच्या वस्तू खरेदी करा. नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मकता निर्माण होईल.
धनु (Sagittarius)
सोन्याचे दागिने, पितळी भांडी किंवा सजावटीच्या वस्तू खरेदी केल्यास आनंद व समृद्धी येईल.
मकर (Capricorn)
पितळी भांडी खरेदी करा. धार्मिक दृष्टिकोनातून ही खरेदी शुभ असून घरात स्थिरता येईल.
कुंभ (Aquarius)
चांदीचे दागिने आणि तांब्याची भांडी खरेदी करा. आरोग्य सुधारेल आणि आर्थिक प्रगती होईल.
मीन (Pisces)
सोने-चांदीचे दागिने किंवा वाहन खरेदी करणे लाभदायक ठरेल. यामुळे जीवनात नवीन संधी आणि प्रगतीचे दरवाजे उघडतील.