मोहित सोमण : आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज पहाटे गिफ्ट निफ्टीत वाढ झाली होती. चीनकडून अतिरिक्त युएसकडून लादलेल्या शुल्कावर सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. तसेच देशांतर्गत सध्या जाहीर होत असलेल्या कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीतील मजबूत निकालावर आज शेअर बाजारात वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रातील सुरुवातीला सेन्सेक्स १७०.३३ अंकाने व निफ्टी ६० अंकाने उसळला आहे. बँक निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाल्याने तसेच सकारात्मक मिड स्मॉल कॅप शेअरमुळे एकूणच शेअर बाजारात वाढ झाली आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सुरूवातीच्या कलात आयटी (१.०७%), तेल व गॅस (०.७२%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.७३%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (०.७५%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे तर घसरण पीएसयु बँक (०.३९%), फार्मा (०.३३%) समभागात घसरण झाली आहे.
सुरुवातीच्या कलात सर्वाधिक वाढ आनंद राठी वेल्थ (६.२१%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (५.५४%), वारी एनर्जीज (४.४८%), एमसीएक्स (४.३९%), टाटा कम्युनिकेशन (४.०३%), हिंदुस्थान झिंक (३.१९%), आरएचआय मॅग्नेस्टा (२.८९%), सीई इन्फोसिस्टिम (२.४३%), एचएफसीएल (२.३०%), गुजरात गॅस (२.००%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.८९%) समभागात झाली आहे.
सुरूवातीच्या कलात सर्वाधिक घसरण ज्युबीलंट इनग्रेव्ह (२.१७%), बंधन बँक (१.६३%), होनसा कंज्यूमर (१.४६%), सारेगामा इंडिया (१.३२%), युको बँक (१.२०%), स्टार हेल्थ इन्शुरन्स (१.१९%), पिरामल फार्मा (१.१६%), डॉ अग्रवाल हेल्थकेअर (१.१४%), वन ९७ (१.०५%), बीएलएस इंटरनॅशनल (१%), सिटी युनियन बँक (०.९२%), वोडाफोन आयडिया (०.९२%), डिक्सन टेक्नॉलॉजी (०.९०%), जेएम फायनांशियल (०.८४%), बजाज होल्डिंग्स (०.६९%), लुपिन (०.६९%) समभागात झाली आहे.
सुरूवातीच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'गेल्या एक वर्षातील बाजार कामगिरीचा एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे लार्ज कॅप्सची कामगिरी चांगली (निफ्टी १.०५% ने वाढली) आणि स्मॉलकॅप्सची कामगिरी कमी (निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स ४.७७% ने कमी). पीएसयू बँकांची कामगिरी चांगली (निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स १६.७७% ने वाढली) आणि आयटीची मोठी कामगिरी कमी (निफ्टी आयटी १६.५% ने कमी) हेही तितकेच महत्त्वाचे आहे. या ट्रेंडमधील एक सामान्य वैशिष्ट्य म्हणजे मूल्यांकन. आयटी स्टॉक्स, विशेषतः लार्ज कॅप्स, बाजाराकडून अतिमूल्यित म्हणून पाहिले जातात कारण त्यांना अनेक अडचणी आणि काही मजबूत संरचनात्मक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे, चांगली वाढ आणि मजबूत बॅलन्स शीट असूनही पीएसयू स्टॉक्स खूप कमी मूल्यांकनावर व्यवहार करत आहेत. मूल्यांकनातील ही विसंगती बाजाराने दुरुस्त केली आहे. हा ट्रेंड सुरूच राहण्याची शक्यता आहे. तथापि, डिजिटल कंपन्या आणि अक्षय ऊर्जा सारख्या वाढीच्या स्टॉकमध्ये, उच्च मूल्यांकन असूनही त्यांची दीर्घकालीन वाढीची क्षमता गुंतवणूक आकर्षित करत राहील.
मुहूर्त ट्रेडिंग जवळ येत असताना, सौम्य तेजीसाठी जागा आहे.