मुंबईतील दस्त नोंदणीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने मुंबईतील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठी 'दिवाळी भेट' दिली आहे. यापुढे मुंबई शहर आणि उपनगरमधील कोणत्याही मुद्रांक शुल्क कार्यालयात क्षेत्रीय मर्यादेची अट न ठेवता दस्त नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे 'वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन' या धोरणाकडे आणखी एक पाऊल टाकण्यात आले आहे.


महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला असून, त्या संदर्भातील राजपत्र देखील जारी करण्यात आले आहे.


नवीन निर्णयामुळे काय बदलणार?


पूर्वी मुंबईत दस्तऐवज नोंदणी करण्यासाठी नागरिक ज्या भागात राहत होते किंवा ज्या भागात मालमत्ता होती, त्याच क्षेत्रातील विशिष्ट मुद्रांक कार्यालयात जाणे बंधनकारक होते. आता ही अट रद्द करण्यात आली आहे.


मुंबईतील 'या' सहा कार्यालयात नोंदणी सुविधा


मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिक आता खालील सहा प्रमुख मुद्रांक कार्यालयांत आपला मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र तसेच अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील


बोरिवली


कुर्ला


अंधेरी


मुंबई शहर (Mumbai City)


प्रधान मुद्रांक कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस (Collector of Stamps Enforcement I)


प्रधान मुद्रांक कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस (Collector of Stamps Enforcement II)


हा निर्णय मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारा असून, महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.


महसूल विभागाचा आणखी एक मोठा निर्णय


यासोबतच महसूल विभागाने जमीन मोजणी संदर्भातही एक मोठा निर्णय घेतला आहे. जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर खासगी परवानाधारक भूमापकांच्या मदतीने हे काम केवळ ३० दिवसांत पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पूर्वी यासाठी ९० ते १२० दिवसांचा कालावधी लागायचा.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या