नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून २-० अशा फरकाने मालिका खिशात घातली आहे. या विजयासह टीम इंडियाने कॅरेबियन संघाला व्हाईटवॉश (Whitewash) दिला आहे. दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी १२१ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. टीम इंडियाने हे आव्हान केवळ ३५.२ ओव्हर्समध्ये ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले आणि ७ विकेट्सने विजय मिळवला. वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचा हा सलग १० वा कसोटी मालिका विजय ठरला आहे, जो एक मोठा विक्रम आहे. युवा कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा पहिला कसोटी मालिका विजय ठरला आहे. या ऐतिहासिक विजयाचे महत्त्व आणखी वाढले कारण, टीम इंडियाने हा विजय आपल्या हेड कोच गौतम गंभीर याला वाढदिवसाचे खास भेट म्हणून समर्पित केला. दुसऱ्या कसोटीत के.एल. राहुलने नाबाद ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या या निर्भेळ विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेतही संघाला मोठी झेप घेता आली आहे.
ठाणे : ठाणे शहरातील पहिली मेट्रो सेवा डिसेंबर २०२५ मध्येच सुरू होणार आहे. उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. उद्घाटनानंतर काही तासांतच ठाणे ...
चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, अंतिम दिवशी फक्त ५८ धावांची गरज
टीम इंडियाने विजयाच्या दिशेने निर्णायक वाटचाल केली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने १२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, एक गडी गमावून ६३ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताला विजयासाठी केवळ आणखी ५८ धावांची गरज होती. भारताने सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या रुपात पहिली विकेट गमावली. यशस्वी ८ धावा करून मैदानाबाहेर परतला. अनुभवी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आणि युवा साई सुदर्शन (Sai Sudharsan) ही जोडी त्या वेळी नाबाद परतली होती. पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताने राहिलेल्या ५८ धावांचा पाठलाग केला. भारताने या धावा आणखी २ विकेट्स गमावून म्हणजे एकूण ३ विकेट्स गमावून) पूर्ण केल्या आणि ७ विकेट्सने सामना जिंकला. केएल राहुलच्या संयमी अर्धशतकी खेळीमुळे भारताने हा विजय सहज साकारला.
राहुलचे नाबाद अर्धशतक निर्णायक
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १२१ धावांचा पाठलाग करताना भारताच्या दुसऱ्या डावात काही विकेट्स गमावल्या असल्या तरी, अनुभवी फलंदाज केएल राहुल आणि युवा खेळाडूंनी संयम दाखवत संघाला विजय मिळवून दिला. युवा फलंदाज साई सुदर्शनने (Sai Sudharsan) संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने ७६ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह ३९ धावांची महत्त्वाची खेळी केली. कर्णधार शुभमन गिल १३ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर केएल राहुल याने दुसऱ्या डावात प्रमुख भूमिका बजावली. त्याने संयम आणि आक्रमकता यांचा योग्य समन्वय साधत १०८ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह नाबाद ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. गिल बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल या जोडीने भारताला विजयापर्यंत पोहोचवले. ध्रुव जुरेलने नाबाद ६ धावा करून राहुलला उत्तम साथ दिली. केएल राहुलच्या या शानदार नाबाद अर्धशतकामुळे टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध २-० अशा फरकाने ऐतिहासिक मालिका विजय नोंदवला.