मोहित सोमण: आज युएस चीनमधील सुरू असलेल्या व्यापार द्वंद्वाचा तणाव जागतिक बाजारपेठेत उमटल्याने आज सोने उच्चांकाच्याही उच्चांकावर पोहोचले आहे. आज सोन्यात भरमसाठ प्रमाणात वाढ झाल्याने सलग तिसऱ्यांदा सोन्याने नवा उच्चांक प्रस्थापि त केला असून चांदीच्या दरानेही आज नव्या उच्चांकावर पाऊल ठेवले. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २९५ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २७० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २२१ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२८३५ रूपये, २२ कॅरेटसाठी ११७६५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९६२६ रूपयांवर पोहोचला आहे.
प्रति तोळा दर पाहिल्यास, २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर २९५० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर २७०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर २२१० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३८३५० रूपयांवर,२२ कॅरेट साठी ११७६५० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी ९६२६० रूपयांवर पोहोचला आहे. देशाच्या बाबतीत सोन्याचा प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२९०० रूपये, २२ कॅरेटसाठी ११८२५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९७७० रूपयांवर पोहोचला आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.३६% वाढ झाल्याने सोने दरपातळी १२५०७९ पातळीवर पोहोचली आहे. तर जागतिक पातळीवरील विचार केल्यास जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्या काळपर्यंत ०.०४% घसरण झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.०७% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४११२.७१ औंसवर गेली आहे.
आज उशीरा अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांचे नवे वक्तव्य अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी दरकपातीवर गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष लागल्याने यापुढे बाजाराला नवी दिशा मिळू शकते. तत्पूर्वी अस्थिरतेच्या तोंडावर कमोडिटीत द बाव अद्याप सुरूच आहे. भूराजकीय तणावात कमोडिटी धातूंतील गुंतवणूकीला मागणी वाढल्याने सोन्याचांदीत तुटवडा जाणवू लागला. परिणामी स्पॉट बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली.अमेरिका-चीन व्यापार तणाव, फेडरल रिझर्व्ह (फेड) च्या अपेक्षा कमी होणे आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये वाढत्या अनिश्चिततेमुळे सुरक्षित आश्रय मागणी कायम राहिल्याने दिवसाच्या सुरुवातीलाच तो $४,१७९ च्या जवळच्या नवीन उच्चांकावर पोहोचला.
संध्याकाळपर्यंत XAU/USD $४१२५ च्या जवळ स्थिर असला तरी दिवसभरात विक्रमी उच्चांकावरून $४०९० पर्यंत किरकोळ घसरण झाली. असे असल्याने सुरुवातीला जागतिक गुंतवणूकदारांनी या भीषण तेजीनंतर व्यापाऱ्यांनी अंशतः नफा मिळवला आहे. तथापि, जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील दीर्घकाळ व्यापारातील अडथळ्याची भीती बाजाराच्या भावनांवर वर्चस्व गाजवत असल्याने नकारात्मक बाजू अजूनही कमी आहे. अखेर आज सोन्यात मोठी वाढ झाली. युएस सरकार शटडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्यात सातत्याने दरवाढ झाली.
चांदीतही उच्चांकी वाढ !
आज चांदीचा दराने लंडनमध्ये पुरवठ्यातील तुटवड्यामुळे नवा आतापर्यंतचा सर्वांधिक उच्चांक गाठला आहे एका अहवालानुसार, लंडनमध्ये स्पॉट रेट ०.४% ने वाढून ५२.५८६८ डॉलर प्रति औंस झाला. यामुळे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडच्या देखरेखीखाली असले ल्या आता बंद पडलेल्या करारावरील जानेवारी १९८० चा विक्रम मोडला. भारतात, सोमवारच्या दरांच्या तुलनेत प्रति किलो चांदीच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, संध्याकाळपर्यंत चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ४ रुपयाने, प्रति किलो दरात ४००० रूपयांनी वाढ झाली परिणामी प्रति ग्रॅम दर १८९ रूपये, तर प्रति किलो दर १८९००० रूपयांवर पोहोचला आहे. भारतामध्ये प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम दर १८९० तर प्रति किलो दर १८९००० रूपयांवर पोहोचले आहेत. जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.४७% घसरण झाली आहे.
आज सकाळी अमेरिका-चीन व्यापार तणाव, जागतिक राजकीय अस्थिरता आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीच्या अपेक्षेमुळे चांदीच्या किमती ५.५८% वाढून १५४६४५ वर स्थिरावल्या होत्या. त्यामुळे चांदीने आज नवा उच्चांक ठरला. बीजिंगच्या दुर्मिळ पृथ्वी निर्यात निर्बंधांना प्रतिसाद म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर १००% कर लादण्याची धमकी दिल्यानंतर, जरी नंतर चीनशी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शविल्यानंतरही आज चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. अमेरिकेतील सरकारचे दीर्घकाळ बंद राहणे, फ्रान्समधील राजकीय गोंधळ आणि जपानमधील नेतृत्व अस्थिरता यासह व्यापक भूराजकीय अनिश्चितता, मौल्यवान धातूंसाठी गुंतवणूकदारांच्या मागणीला आणखी चालना मिळाली. त्यामुळे चांदीतही मोठी वाढ झाली होती.