जोगेश्वरीत वीट पडून तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोन अभियंत्यांना अटक

जोगेश्वरीमध्ये बांधकाम सुरू असेलल्या इमारतीमधून सिमेंटची वीट पडून खालून जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी संबंधित इमारतीच्या दोन अभियंत्यांना अटक केली आहे सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याचे ठपका ठेवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.


या घटनेप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. शनिवारी पोलिसांनी साईट अभियंता शंभू कुमार पलट पासवान (२९) आणि गौरव दिनेशभाई सोनडगर (३९) या दोघांना अटक केली. त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी तपास सुरू असून या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या आणखी काही जणांना अटक होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


जोगेश्वरी पूर्व येथील मजासवाडी परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या इमारतीमधून वीट खाली पडून २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अखेर कडक पाऊल उचलत इमारतीचा विकासक, ठेकेदार आणि सुपरवायझर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी ८ ऑक्टोबरला सकाळी घडली होती. मृत तरुणी आपल्या कामावर जात असताना, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून अचानक एक वीट डोक्यात पडल्यामुळे रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.

Comments
Add Comment

मुंबईतील इमारत बांधकामांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करा, भाजपची मागणी

मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा

थकीत ४ हजार कोटींची रक्कम द्या!

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत चार हजार कोटी

Red Soil Storiesच्या शिरीष गवस यांच्या आजारपणाबद्दलचं सत्य आलेय समोर...पत्नीने सांगितले सर्व काही...

मुंबई: प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवस यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्यांना

मुंबईच्या कुर्ला परिसरात भीषण आग, अनेक दुकाने आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरातील अनेक दुकानांना भीष आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीच्या

थकीत ४ हजार कोटींची रक्कम द्या ! विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन

मुंबई (प्रतिनिधी): एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी