वडाळा सहकार नगरमधील भाडेकरुंना मिळणार दिलासा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आयुक्तांना 'या' सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वडाळा सहकार नगर येथील महापालिका मालकीच्या इमारतींमध्ये महापालिकेचे भाडेकरु असून त्यांना सन २०१७ पासून मालमत्ता कराची आकारणी केली जाते. त्यामुळे महापालिकेला नियमित भाडे भरले जात असल्याने त्यांना आकारण्यात येणारा मालमत्ता कराची आकारणी रद्द करण्यात यावी यावी ही मागणी होत असतानाच याप्रकरणात आता उपमुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश देत याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत


मुंबई महापालिकेचे माजी आरोग्य समिती अध्यक्ष माजी नगरसेवक अमेय घोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देवून एफ उत्तर विभागातील वडाळा सहकार नगर येथील महापालिका भाडेकरूंवर २०१७ पासून लावण्यात आलेल्या मालमत्ता कर अर्थात 'अॅसेसमेंट टॅक्स रद्द करण्याबाबत तसेच भरलेली रक्कम भविष्यातील भाड्यात समायोजित करण्याची मागणी केली आहे. या निवेदनानुसार उपमुख्यमंत्र्य एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश देत तात्काळ कार्यवाही व्हावी अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत.


घोले यांनी आपल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, सहकार नगर परिसरातील महापालिका मालकीच्या इमारतीमधील रहिवासी हे महापालिकेचे भाडेकरू आहेत. हे सर्व भाडेकरू नियमितपणे महापालिकेकडे दरमहा भाडे भरतात, मात्र २०१७ पासून महापालिकेकडून या भाडेकरूंना मालमत्ता कर आकारण्यात येत आहे, जो पूर्णपणे अन्यायकारक आहे.


ते निवेदनात असे म्हणतात की, भाडेकरू महापालिकेकडे आधीच भाडे भरत असल्याने, त्यांच्याकडून स्वतंत्रपणे मालमत्ता कर आकारणे हे कायद्याच्या कोणत्याही तरतुदीत बसत नाही. यामुळे नागरिकांवर दुहेरी आर्थिक बोजा पडत आहे आणि महापालिकेच्या भाडेकरूंच्या हक्कांवर अन्याय होत आहे. त्यामुळे सहकार नगर येथील सर्व महापालिका भाडेकरूंवरील २०१७ पासून लावलेला मालमत्ता करतात्काळ रद्द करण्यात यावा. तसेच ज्यांनी आधीच हा कर भरलेला आहे. त्या नागरिकांच्या भरलेल्या रकमेचे भविष्यातील महापालिका भाड्यात समायोजन करण्यात यावे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करून भविष्यात अशा प्रकारे भाडेकरूंवर दुहेरी कर आकारणी होऊ नये यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात यावीत,असे नमुद केले आहे.


Comments
Add Comment

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत

मुंबई : आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर

मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूरमधील नागरिकांना धो धो पाणी, चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय जलबोगदा महिना अखेर होणार कार्यान्वित

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलशयापर्यंतच्या

भीम यूपीआयद्वारे 'मुंबई वन' तिकिटांवर २० टक्के सवलत

एमएमआरडीएकडून ३१ डिसेंबरपर्यंत ऑफर मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यांच्या

आज मध्यरात्री कल्याण-बदलापूर दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री कल्याण आणि बदलापूर दरम्यान चार ठिकाणी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई, विदर्भ,मराठवाड्यात थंडीची चाहूल

राज्यभरात तापमान कमी होणार मुंबई  : राज्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसाने

बीकेसीच्या धर्तीवर वडाळ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र

एमएमआरडीए करणार १५० एकर जागेचा विकास मुंबई  : वडाळ्यातील आपल्या मालकीच्या १५० एकर जागेचा विकास वांद्रे-कुर्ला