Influenza : मोठं संकट! टोक्योमध्ये १३० हून अधिक शाळा बंद, थेट महामारीची घोषणा, भारतासह आशियासाठी धोक्याची घंटा?

टोकियो : करोना महामारीच्या (Corona Pandemic) धक्क्यातून जग सावरत असतानाच, आता आणखी एका मोठ्या संकटाचे सावट घोंघावताना दिसत आहे. जपानने (Japan) देशात 'इन्फ्लूएंझा महामारी' (Influenza Pandemic) जाहीर केली आहे. फ्लूच्या रुग्णसंख्येत अचानक आणि अकाली वाढ झाल्यामुळे जपानच्या आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. देशात ४,००० हून अधिक लोक रुग्णालयात दाखल (Hospitalized) आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जपानमध्ये फ्लूचे रुग्ण वाढणे नवीन नाही, परंतु ज्या हंगामात ते वाढतात, त्याच्या खूप आधी यंदा ही समस्या निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, हा प्रकोप नेहमीपेक्षा पाच आठवडे आधी आला आहे. हा बदल संपूर्ण आशियात विषाणूच्या प्रसाराच्या पद्धतीत बदल दर्शवतो, ही अधिक चिंतेची बाब आहे. सुरुवातीपासूनच या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी जपान सरकारने उपाययोजना जाहीर केल्या असून, आता या संकटाचा सामना कसा होतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.



जपानमधील 'इन्फ्लूएंझा'चा उद्रेक भारतासह इतर देशांसाठी धोक्याची घंटा?


जपानमध्ये अकाली जाहीर झालेल्या 'इन्फ्लूएंझा महामारी'मुळे भारतासह इतर आशियाई देशांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. विशेषतः आगामी हिवाळ्याचा हंगाम पाहता, या संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे संकेत मिळत आहेत. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना खबरदारी म्हणून लवकरात लवकर लसीकरण (Vaccination) करून घेण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांनी चेतावणी दिली आहे की, फ्लूच्या रुग्णसंख्येतील ही सुरुवातीची वाढ रुग्णालय व्यवस्थेवर मोठा दबाव आणू शकते. जपानमध्ये जरी याला हंगामी फ्लूचा प्रकोप म्हटले जात असले तरी, त्याचे प्रमाण आणि उद्रेकाची वेळ यामुळे भारतासह अनेक देशांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. हिवाळ्याचा हंगाम जवळ येत असल्याने श्वसनाचे आजार आणि तक्रारी वाढतात. या पार्श्वभूमीवर, विषाणूच्या प्रसाराच्या पद्धतीत झालेला हा बदल भारताच्या सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकतो. भारताला आता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि पाळत ठेवण्याची गरज आहे.



१३० हून अधिक शाळा बंद, रोगप्रतिकारक शक्तीतील बदलांमुळे वाढले संकट


अधिकाऱ्यांच्या मते, ४७ पैकी २८ प्रांतांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, विशेषतः टोक्यो, ओकिनावा आणि कागोशिमा यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अधिक रुग्ण आढळले आहेत. या भागांमध्ये १३० हून अधिक शाळा आणि बालसंगोपन केंद्रे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहेत. डॉक्टरांच्या मते, यंदा हा इन्फ्लूएंझाचा उद्रेक अनेक कारणांमुळे अधिक गंभीर झाला आहे. फ्लू विषाणूचा एक वेगळा प्रकार या प्रकोपात समाविष्ट आहे, जो यापूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे सांगितले जात आहे. कोविड-१९ महामारीदरम्यान (COVID-19 Pandemic) अनेक वर्षे कमी संपर्कामुळे लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीतील चढ-उतार हे देखील रुग्णसंख्या वाढण्याचे एक मोठे कारण आहे. अनियमित हवामानामुळेही विषाणूचा संसर्ग जलद गतीने वाढत आहे. यासोबतच डॉक्टर या समस्येसाठी फ्लूसाठी कमी झालेले लसीकरण देखील जबाबदार मानतात. महामारीनंतर बहुतेक लोक बेफिकीर झाले आहेत आणि वार्षिक फ्लूची लस घेण्यासाठी वेळ देत नाहीत, ज्यामुळे विषाणूचा प्रसार जलद गतीने होत आहे.



मोठी महामारी व्हायची शक्यता?


तज्ज्ञांच्या मते, सध्या तरी ही मोठी महामारी बनण्याची शक्यता नाही. कारण हा एक हंगामी इन्फ्लूएंझा महामारी आहे, जी प्रामुख्याने H३N२ नावाच्या स्ट्रेनमुळे होते. या स्ट्रेनवर शास्त्रज्ञांनी यापूर्वीच अभ्यास केला आहे. जरी मोठी महामारी बनण्याची शक्यता नसली तरी, या प्रकोपाला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जपानमधील हा उद्रेक निश्चितपणे एक चेतावणी आहे. त्यामुळे सतत निरीक्षण आणि लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आणि निर्णायक आहे. डॉक्टर वारंवार वृद्ध, मुले आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींना लस घेण्याचे आवाहन करत आहेत, कारण या गटांना संसर्गाचा धोका अधिक असतो.

Comments
Add Comment

Afghanistan Earthquake : अफगानिस्तानमध्ये पहाटे ६.३ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ७ लोकांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.

अफगानिस्तान : अफगानिस्तानमध्ये सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी तडकाफडकी पहाटेच्या (Early Morning) वेळी जोराचा भूकंप (Strong Earthquake)

जगभरातील पुरुष नोव्हेंबरमध्ये ‘शेव्हिंग’ का टाळतात?

लंडन : नोव्हेंबर महिना सुरू झाला की, सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू होतो. तो म्हणजे ‘नो शेव्ह नोव्हेंबर’. ट्विटर

भीषण अग्नितांडव; सुपरमार्केटमधील आगीत लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू

मेक्सिको : सणासुदीच्या काळात मेक्सिकोच्या सोनारा राज्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून

श्रेयस अय्यरला सिडनीतील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; फिट झाल्यानंतर भारतात परतणार

सिडनी : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून सिडनीमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट

हिंदू पत्नीबद्दलच्या वक्तव्यामुळे व्हान्स यांच्यावर हिंदुफोबिक असल्याची टीका

वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि उषा व्हान्स यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात सध्या

महापौरपदाचे उमेदवार झोहरान ममदानींनी मोदींवर केले गंभीर आरोप

न्यू यॉर्क : अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील महापौरपदासाठी (मेयर) ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. प्रचारावेळी