भारताविरुद्धच्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर विंडीज ९७ धावांनी पिछाडीवर


नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना दिल्लीच्या जेटली स्टेडियमवर सुरू आहे. याआधीचा अहमदाबादचा कसोटी सामना भारताने एक डाव आणि १४० धावांनी जिंकला आहे. आता दिल्लीच्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर विंडीज ९७ धावांनी पिछाडीवर आहे. यामुळे भारताची बाजू सध्या वरचढ दिसत आहे.


दिल्ली कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने पाच बाद ५१८ धावा करुन पहिला डाव घोषीत केला. नंतर विंडीजचा डाव २४८ धावांत आटोपला. फॉलोऑन मिळाल्यामुळे पुन्हा फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन बाद १७३ धावा केल्या. अद्याप वेस्ट इंडिज ९७ धावांनी पिछाडीवर आहे. शाई होप ६६ आणि जॉन कॅम्पबेल ८७ धावांवर खेळत आहे. मोहम्मद सिराजने टी. चंदरपॉलला (१० धावा) शुभमन गिलकरवी झेलबाद केले तर अ‍ॅलिक अथानाझे सात धावा करुन वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.


वेस्ट इंडिजकडून पहिल्या डावात अ‍ॅलिक अथानाझेने सर्वाधिक ४१ धावा केल्या होत्या. कॅम्पबेलने १०, चंदरपॉलने ३४, होपने ३६, कर्णधार असलेल्या चेसने शून्य, यष्टीरक्षक इमलाचने २१, ग्रीव्हजने १७, पिअरेने २३, वॉरिकनने १, सील्सने १३ आणि फिलिपने नाबाद २४ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने पाच, रवींद्र जडेजाने तीन तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली.


भारताची फलंदाजी


भारताने पहिल्या डावात पाच बाद ५१८ धावा केल्या आणि डाव घोषीत केला. भारताकडून यशस्वी जयस्वालने १७५, केएल राहुलने ३८, साई सुदर्शनने ८७, कर्णधार शुभमन गिलने १२९, नितीश रेड्डीने ४३, यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने ४४ धावांचे योगदान दिले. वॉरिकनने तीन आणि चेसने एक बळी घेतला.





Comments
Add Comment

IND vs AUS : स्मृती-प्रतिकाच्या शानदार अर्धशतकांमुळे भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे विशाल लक्ष्य!

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर

टी-२०मधील सर्वात धक्कादायक निकाल, दुबळ्या नामिबियाने बलाढ्य द. आफ्रिकेला हरवले

विंडहोक : क्रिकेट जगतात नामिबियाने एक मोठा उलटफेर केला आहे. नामिबियाने त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळल्या

IND(W) vs AUS(W): आज भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने, कोणाचे पारडे आहे जड? घ्या जाणून

मुंबई: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आज १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाची लढत ऑस्ट्रेलियासोबत होत

शुभमन गिलने रचला इतिहास... WTC मध्ये तोडला रोहित शर्माचा विक्रम

मुंबई: भारतीय कर्णधार शुभमन गिल टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवत आहे. गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू

Shubman Gill Century : कर्णधार शुभमन गिल नावाचं 'वादळ' थांबायचं नाव घेत नाही! वेस्ट इंडिजला धुवून काढत रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतक नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2)

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि