नवी दिल्ली: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शनिवारी गंभीर संघर्षामध्ये बदलला. येथे अफगाण तालिबानी सैन्याने पाकिस्तानच्या विविध सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये हल्ला केला. हे हल्ले पक्तिया, पक्तिका, कुनर, खोस्त, हेलमंद आणि नंगरहार या प्रांतामध्ये झाले. अफगाण तालिबानने सांगितले की ही कारवाई पाकिस्तानने नुकत्याच केलेल्या एअर स्ट्राईकला दिलेले प्रत्युत्तर आहे. यात अफगाणिस्तानच्या सीमेजवळील एका बाजाराला लक्ष्य बनवण्यात आले होते.
पाकिस्तानी सैन्यानेही प्रत्युत्तर दिले. तसेच अनेक अफगाणिस्तानचे तळ नष्ट केल्याचा दावा केला आहे. व्हिडिओ फुटेज आणि मिडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानच्या लष्कराला मोठे नुकसान पोहोचले. त्यांचे अनेक लष्करी तळ नष्ट झाले आहेत तसेच त्यांच्याकडून हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत. या हिंसक झडपेदरम्यान पाकिस्तानचे ड्रोन्स तसेच रडार सिस्टीमलाही नुकसान पोहोचले आहे.
तालिबान सरकारने या गोष्टीला दुजोरा दिला की त्यांच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या अनेक चौक्यांवर ताबा मिळवला आहे. तर पाकिस्तानचे अधिकारी या संघर्षाला अनावश्यक केलेला गोळीबार असे म्हणत आहेत. तर अफगाणिस्तानच्या पक्षाने या संप्रुभतेची सुरक्षा असल्याचे म्हटले आहे.
काबूलमध्ये पाकिस्तानने केला होता हवाई हल्ला
ही हिंसा काबूल आणि पक्तिकामध्ये झालेल्या विस्फोटानंतर झाली आहे. अफगाण सरकारने पाकिस्तानवर आपल्या क्षेत्राकील हवाई सीमेचा उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.