सोहा अली खानची दिवाळी साफसफाई जिममध्येच! मजेशीर व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधले


मुंबई : दिवाळी जवळ येताच सगळीकडेच साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. यात सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. अभिनेत्री सोहा अली खान हिने नुकताच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती घरात नाही तर जिममध्येच साफसफाई करताना दिसत आहे!


सोहाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती जिममध्ये एक्ससाइज करताना साफसफाई करताना दिसते. व्हिडीओमध्ये ती हातात कपडा घेऊन जिमच्या काचा वरपासून खालपर्यंत पुसताना दिसते पण हा फक्त साफसफाईचा प्रकार नाही, तर हातांच्या स्नायूंना मजबूत करण्याचाही एक भन्नाट प्रयत्न आहे असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.


इतकंच नाही, सोहाने मॉपिंगलाही एक्सरसाइजमध्ये बदललं. तिने पायाखाली कपडा ठेवून लादी साफ केली आणि त्यातून कॅलरी बर्नही केल्या. या व्हिडिओला तिने मजेशीर कॅप्शनही दिलं आहे:


"दिवाळीपूर्वी थोडी जिमची साफसफाई... आरसा पुसला, लादी साफ केली आणि सोबत कॅलरीही बर्न केल्या. एवढी हालचाल असताना व्हॅक्युम क्लीनरची काय गरज ?"


सोहा अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने 2004 मध्ये ‘दिल मांगे मोर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पुढे ती ‘रंग दे बसंती’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘खोया खोया चांद’, ‘मुंबई मेरी जान’, ‘दिल कबड्डी’, ‘साहेब, बीवी और गैंगस्टर’ आणि ‘घायल वन्स अगेन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. ‘रंग दे बसंती’मधील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं.

Comments
Add Comment

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे