पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या: कारणे आणि उपाय

मुंबई : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. विशेषतः ३०-३५ वर्षांनंतर अनेक पुरुषांच्या केसांची घनता कमी होऊ लागते, तर काहींना तरुण वयातच केसगळतीची समस्या जाणवू लागते. काही पुरुषांना अगदी २० व्या वर्षीच केसगळती ची समस्या जाणवते. हि समस्या मानसिक तणावाचे कारण ठरू शकते.


केसगळतीमुळे बदलणाऱ्या लूकमुळे अनेक पुरुष कृत्रिम केसांचा वापर करतात, विग लावतात किंवा हेअर ट्रान्सप्लांटसारख्या पद्धतींचा अवलंब करतात. काही जण हे खुलेपणाने स्वीकारतात, तर काही जण ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण खरं सांगायचं झालं, तर केस हे शरीराचा एक सामान्य भाग आहेत. केस गळणे ही कोणतीही लाज वाटावी अशी गोष्ट नाही.


पुरुषांमध्ये केस गळण्यामागे प्रमुख कारण म्हणजे अँड्रोजेनेटिक अ‍ॅलोपेशिया (Androgenetic Alopecia), ज्याला सामान्य भाषेत मेल पॅटर्न बाल्डनेस म्हटले जाते. हे प्रामुख्याने दोन कारणांमुळे होते – अनुवांशिकता आणि टेस्टोस्टेरॉन या पुरुष हार्मोनचा परिणाम. केसगळतीची सुरुवात डोक्याच्या मध्यभागी किंवा कपाळापासून होते आणि हळूहळू संपूर्ण टाळूपर्यंत पोहोचते.


याशिवाय पौष्टिकतेचा अभाव, तणावपूर्ण जीवनशैली, रसायनांचा अति वापर, हार्मोनल बदल, आणि टाळूवरील संसर्ग यांसारखी अनेक कारणे केसगळतीला कारणीभूत ठरू शकतात.


आजच्या घडीला केस गळतीवर विविध उपचार उपलब्ध आहेत, घरगुती उपाय, औषधोपचार, विशेष तेलं, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणारे केस प्रत्यारोपण (Hair Transplant). मात्र कोणताही उपचार सुरू करण्याआधी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.


शेवटी केस हे सौंदर्याचा भाग असतात. पण केस गळणे म्हणजे कमजोरी नाही, तर त्यावर योग्य उपाय आणि ते स्वीकारणे आवश्यक आहे. लुकमध्ये बदल करण्यासाठी जर कृत्रिम केस किंवा इतर पद्धतींचा वापर केला जात असेल, तर त्यामध्ये कोणतीही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. तसेच समाजानेदेखील याकडे एक सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

बार्ट्रॉनिक्स लिमिटेड एस एन एन कंपनीचे अधिग्रहण करणार

मोहित सोमण: बार्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bartronics Limited) कंपनीने आज एक्सचेंज फायलिंगमध्ये एसएनएन (Shree Naga Narasimha Private Limited SNN) कंपनीचे

कल्याण–डोंबिवलीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कल्याण :कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवरील

शिवसेनेसोबत मनसेने जाणे मला पटले नाही

ठाणे :कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय समीकरणात शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिल्यामुळे उबाठातून मोठी खळबळ

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अटक

मुंबई :एका ७५ वर्षीय निवृत्त महापालिका अधिकाऱ्याची सायबर गुन्हेगारांनी १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

राज्यपालांविरोधात ‘सर्वोच्च’मध्ये जाण्याची सिद्धरामय्या यांची तयारी

कर्नाटकातही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चिघळला नवी दिल्ली  : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी

ओडिशात बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट बंद

ओडिशा राज्याचा निर्णय नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ओडिशा सरकारने गुरुवारी राज्यात बिडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू, खैनी