आंध्र प्रदेशात उभारणार आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर

टेक कंपनी गुगल भारताच्या डिजिटल क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आशिया खंडातील सर्वात मोठे डेटा सेंटर क्लस्टर उभारणार आहे. या प्रकल्पात कंपनी सुमारे १० अब्ज डॉलर्स (सुमारे ८,७३० कोटी रुपये) गुंतवणार आहे. गूगल विशाखापट्टणममध्ये १ गिगावॉट (१ ॠथ) क्षमतेचा मेगा डेटा सेंटर क्लस्टर स्थापित करणार आहे. हा प्रकल्प केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा डेटा हब ठरणार आहे.


रिपोर्ट्सनुसार, हा क्लस्टर तीन वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये विकसित केला जाईल. यामध्ये विशाखापट्टणम जिल्ह्यातील अदाविवरम आणि तरलुवाडा, तसेच अनकापल्ली जिल्ह्यातील रामबिल्ली यांचा समावेश असेल. गुगलचा हा महत्त्वाकांक्षी डेटा हब प्रकल्प जुलै २०२८ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. गुगलची ही १० अब्ज डॉलर्सची मेगा गुंतवणूक केवळ डेटा सेंटरच्या उभारणीपुरती मर्यादित नाही.


या प्रकल्पात तीन उच्च क्षमतेच्या सबमरीन केबल्स, केबल लँडिंग स्टेशन, मेट्रो फायबर नेटवर्क आणि अत्याधुनिक दूरसंचार पायाभूत सुविधांचे देखील बांधकाम केले जाईल. या प्रकल्पामुळे आंध्र प्रदेशला ‘डेटा इन्फ्रास्ट्रक्चर हब’ बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडणार आहे.


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि गूगल यांच्यात डिसेंबर२०२४ मध्ये सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने ‘डेटा सिटी’ विकासाला गती देण्यासाठी आयटी आणि कॉपीराईट कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


मुख्यमंत्री नायडू यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

बुधवारी मुख्यमंत्री पेणमध्ये; फोडणार प्रचाराचा नारळ

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध ही पुन्हा सत्ता स्थापनेची नांदी  स्वप्नील पाटील पेण : राज्यातील नगर परिषदेच्या

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे १९-२० डिसेंबरला मुंबईत आयोजन

जगभरातील अग्रणी उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठ मुंबई : वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक

शीळफाटा येथे उड्डाणपुलाच्या कामानिमित्त निळजे-दातिवलीदरम्यान ब्लॉक

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पासाठी शीळ फाटा येथील उड्डाणपूल हटविण्याच्या कामासाठी,

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

मुंबई : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री