पुन्हा एकदा आर्यन खान विरुद्ध समीर वानखेडे

नवी दिल्ली :  आर्यन खान विरोधात झालेल्या चर्चित ड्रग्ज प्रकरणात तपास करणारे नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागाचे माजी प्रमुख समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित असलेल्या "Bads ऑफ बॉलीवुड" या वेब सिरीजविरोधात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


"Bads ऑफ बॉलीवुड" ही सीरिज शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसने तयार केली आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या मालिकेत आपली प्रतिमा जाणूनबुजून मलिन करण्यात आली, तसेच काही दृश्यांमधून पोलिस अधिकाऱ्यांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी केला आहे. समीर वानखेडेंनी मानहानीचा खटला दाखल करत न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच समीर वानखेडे यांनी त्यांच्या वकिलांमार्फत नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटला नोटीस पाठवली असून, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सरकारकडे संरक्षणाची मागणी केली आहे.


वानखेडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “या प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला पाकिस्तान, यूएई आणि काही इतर देशांमधून धमकीचे ईमेल्स येत आहेत. मात्र आम्ही घाबरणार नाही. आम्ही याचिका मागे घेणार नाही, कारण ही लढाई सत्यासाठी आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की आर्यन खान प्रकरण” हे केवळ एकच प्रकरण नव्हतं — त्या तपासात अनेक आरोपी सहभागी होते... “मी माझं काम केलं, आणि आजही मी लढण्यासाठी तयार आहे. मी कधीच आव्हानांना घाबरलो नाही, आणि सत्य नक्कीच बाहेर येईल,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले. सीरिजमध्ये ‘सत्यमेव जयते’ सारख्या घोषवाक्याची खिल्ली उडवण्यात आली असून, त्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे. त्यामुळे वानखेडेंनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.


न्यायालयीन चौकशी


दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांना समन्स बजावले आहे. उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतरांना सात दिवसांत त्यांचे उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. याचिकेत तीन दिवसांत उत्तर मागितले असून . या प्रकरणाची सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होईल.

Comments
Add Comment

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात

भारतीय आहाराविषयीच्या संशोधनात उघड झाली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : सध्या बहुसंख्य भारतीय जो आहार घेतात त्यात कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त आहे. या आहारात प्रथिने आणि

चीन सीमेजवळच्या भारतीय गावांचा झपाट्याने विकास

तवांग : चीन सीमेजवळच्या भारतीय गावांचा झपाट्याने विकास सुरू आहे. तवांग जिल्ह्यातील सीमेजवळच्या १५० गावांमध्ये

निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ पर्यायी ओळखपत्रे मंजूर

नवी दिल्ली  : देशभरातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे निर्देश जारी केले

अन्नधान्य उत्पादनात देश आत्मनिर्भर, यानंतर निर्यातीसाठी उत्पादन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ४२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ नवी दिल्ली - देशाच्या