अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र आता रद्द होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई:राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना (मल्टी ब्रँड आउटलेट) विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे 'ट्रेड प्रमाणपत्र' रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले. ते ऑटोमो बाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते. प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार, या बैठकी ला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्या सह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित हो ते

निर्णयात काय म्हटले गेले?

'मल्टी ब्रँड आउटलेट '(MBO) सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झालेली आहे. राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनाधिकृत वाहन विक्री करीत असतात. राज्यात इतर विभागातून तसेच परराज्यातून न वीन वाहने आणून 'ट्रेड प्रमाणपत्र ' नसताना अनाधिकृतरित्या वाहन विक्री करतात . भविष्यात अशा अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या अधिकृत वाहने विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले.

या बैठकीमध्ये ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या विविध मागण्यांच्या वर चर्चा झाली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहिले आहे.
Comments
Add Comment

रतन टाटा यांचा सेशेल्समधील विला विक्रीसाठी

मुंबई : रतन टाटा यांचा सेशेल्समधील आलिशान बीचफ्रंट विला आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. माहे बेटाच्या शांत, नयनरम्य

राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे

नवी दिल्ली : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे.

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या

डहाणू नगर परिषद निवडणुकीत थेट लढत!

पालघर, वाडा, जव्हारमध्ये तिरंगी लढत पालघर : नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक

महाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील