प्रतिनिधी:चांदी आज सर्वोच्च पातळीवर गेली आहे. आज सकाळीच कालच्या तुलनेत प्रति ग्रॅम ३ रुपयांनी चांदी महागली असून गेल्या संपूर्ण आठवड्यात प्रति ग्रॅम दरात तब्बल २१००० रूपयांनी महागली आहे. आज आणखी ३ रुपयांनी प्रति ग्रॅम चांदी महागल्याने चांदी प्रति ग्रॅम दर १७७ रुपयांवर, व आज किलोमागे चांदी थेट ३००० रूपयांनी महागल्याने चांदी प्रति किलो दर १७७००० रूपयांवर पोहोचली आहे.त्यामुळे सलग दुसऱ्यांदा चांदी नव्या उच्चांकावर पोहोचली.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दर १७७ रुपयांवर प्रति किलो दर १७७००० रुपयांवर गेले आहे. हाच दर गेल्या आठवड्यात ६ ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम १५६० रुपये आणि किलो १५६००० रुपये होता. सोन्यापेक्षाही चांदीच्या दरात मागणीसह भाकीतांची सौदेबाजी वाढल्या ने सहाजिकच चांदीच्या मागणीसह तेजीतही वाढ झाली. मुंबईसह, भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १७७० रूपये, प्रति किलो दर १७७००० रुपये आहे. कमोडिटी बाजार एमसीएक्समध्येही चांदीच्या दरात सकाळी ०.२६% वाढ झाल्या ने दरपातळी १४६६९८ रूपयांवर गेली. जागतिक बाजारपेठेत चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात आज सकाळपर्यंत ०.१९% वाढ झाली आहे.
जागतिक पातळीवर मध्यपूर्वेतील युद्धबंदीच्या वृत्त सुरू झाल्याने शांततेच्या आनंदाला प्रतिसाद म्हणून चांदी काही प्रमाणात स्वस्त झाली. तसेच रूपयांच्या वाढीसह भारतीय बाजारापेठेतही चांदीची वाढ नियंत्रित राहण्यास मदत झाली. तरीही सणासुदीच्या काळा त आज चांदी भारतीय बाजारातीलील मागणी आधारे चांदी महागली. काल जागतिक पातळीवरील चांदीच्या किमती २.३६% ने घसरून १४६३२४ वर स्थिरावल्या. तर भारतीय कमोडिटी बाजार एमसीएक्सवर $५१ (१५३०००) पेक्षा जास्त ऐतिहासिक उच्चांक गाठ ल्यानंतर नफा बुकिंग सुरू झाले. सत्राच्या सुरुवातीला झालेल्या तीव्र वाढीला मजबूत सुरक्षित-आश्रय मागणी, कमी पुरवठा आणि अमेरिकेच्या वित्तीय जोखीमांबद्दल सततच्या चिंता, वाढती जागतिक कर्ज आणि कमी व्याजदरांच्या अपेक्षा यामुळे चालना मिळाली. लंडनच्या बाजारात मुक्तपणे उपलब्ध असलेल्या चांदीच्या कमतरतेमुळे देखील पाठिंबा मिळाला.
Technical Outlook:
जागतिक स्तरावरील सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या मते, २०२५ मध्ये जागतिक चांदीची तूट २१% ने कमी होऊन ११७.६ दशलक्ष औंस होण्याची अपेक्षा आहे, एकूण पुरवठा २% वाढेल आणि मागणी १% कमी होईल. औद्योगिक वापर सुमारे ६८० दशलक्ष औंसच्या विक्र मी पातळीवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे, तर दागिने आणि चांदीच्या वस्तूंची मागणी कमी होऊ शकते. तथापि, गेल्या वर्षीच्या तीव्र घसरणीनंतर चांदीची नाणी आणि बारची मागणी ७% ने वाढण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या मध्यापर्यंत चांदीच्या ई टीपी होल्डिंग्ज १.१३ अब्ज औंसपर्यंत वाढल्या आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली, ज्याचे एकूण मूल्य पहिल्यांदाच ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाले.तांत्रिकदृष्ट्या, बाजारावर नवीन विक्रीचा दबाव कायम आहे, कारण ओपन इंटरेस्ट २१. २३% ने वाढून २६,८८५ कॉन्ट्रॅक्ट्सवर पोहोचला आहे तर किमती ३,५३१ मध्ये घसरल्या आहेत. चांदीला १४२३५० वर तात्काळ आधार आहे आणि त्याखाली ब्रेक १३८३८० वर येऊ शकतो, तर १५१,८४० वर प्रतिकार दिसून येतो, ज्याच्या वर किमती १५७३६० वर पोहोचू शकतात.
भारतातही चांदीचा दर सातत्याने का वाढतोय?
१) दिवाळीची तयारी (सणासुदीची तयारी)
२) फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर रेपो दरातही कपात होईल ही गुंतवणूकदारांना आशा
३) दरवर्षीपेक्षा चांदीच्या मागणीतही वाढ
४) अनियंत्रित रूपया
५) सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय
६) वाढलेली औद्योगिक मागणी
७) वाढलेली ईटीएफ गुंतवणूक, वाढलेली मागणी
८) स्पॉट बेटिंग
९) जागतिक अस्थिरता
१०) वाढलेली शॉर्ट ट्रेडिंग
११) ईटीएफ व प्रत्यक्ष गुंतवणूकीत वाढलेला किरकोळ गुंतवणूकदारांचा प्रतिसाद
या प्रमुख कारणामुळे चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होताना होत आहे.बाजार विश्लेषकांच्या मते, अलीकडच्या आठवड्या त चांदीच्या किमती वाढण्यात किरकोळ गुंतवणूकदारांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. सणासुदीतील मागणी सणांच्या भेटवस्तू आ णि चांदीचा औद्योगिक वापर विशेषतः सौर आणि इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रातील मागणी यासारख्या हंगामी घटकांनी या वाढीस हातभार लावला आहे. तथापि, तज्ञांचे म्हणणे आहे की मर्यादित मूलभूत आधारासह. सध्याची किंमत गती वाढत्या प्रमाणात सट्टेबाजी ची आहे.