येथे अशा १० प्रसिद्ध ठिकाणांची माहिती दिली आहे जिथे तुम्ही मनमुराद खरेदी करू शकता, तीही अगदी बजेटमध्ये!
१. रविवार पेठ – सजावटीचं हॉटस्पॉट
सणासुदीच्या सजावटीच्या वस्तू, कृत्रिम हार, सौंदर्य प्रसाधने आणि दागिन्यांची घाऊक खरेदी करायची असेल तर रविवार पेठ हा सर्वोत्तम पर्याय आहे. लक्षात ठेवा, या बाजारपेठेचं नाव ‘रविवार’ असलं तरी ती रविवारी बंद असते!
२. तापकीर गल्ली (लाइट मार्केट)
बुधवार पेठेत असलेली ही गल्ली खास दिव्यांसाठी आणि पारंपरिक झुंबरांसाठी ओळखली जाते. येथील आकर्षक दिवे दिवाळीच्या सजावटीला उठाव देतात आणि किमतीही खिशाला परवडणाऱ्या असतात.
३. कुंभार वाडा – मातीच्या दिव्यांचं घर
पारंपरिक मातीच्या दिव्यांची किंवा कंदिलांची खरेदी करायची असेल तर कुंभार वाडा विसरू नका. इथले कुशल कुंभार दिवाळीच्या सजावटीला रंगत आणतात.
४. फॅशन स्ट्रीट
स्वस्तात ट्रेंडी कपड्यांची शॉपिंग करायची असेल, तर फॅशन स्ट्रीटपेक्षा उत्तम ठिकाण नाही. कॉलेज तरुणाईची पहिली पसंती असलेलं हे ठिकाण कपडे, बॅग, घड्याळं आणि ॲक्सेसरीजसाठी परफेक्ट आहे.
५. तुळशीबाग – पारंपरिक खरेदीचं ठिकाण
शहराच्या मध्यभागी असलेली तुळशीबाग ही रेडीमेड कपड्यांपासून ते छोट्या सौंदर्यसामग्रीपर्यंत सर्व वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. इथे सौदेबाजी केल्यास चांगल्या किमतीत खरेदी करता येते.
६. बाजीराव रोड – होम डेकोरसाठी बेस्ट
दिवाळी म्हटली की घरात थोडा बदल हवा! फर्निचर, सजावटीच्या वस्तू आणि घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी बाजीराव रोड हे योग्य ठिकाण आहे.
७. एफ.सी. रोड – कॉलेज क्राउडचं फेव्हरेट मार्केट
फर्ग्युसन कॉलेज रोडवर तुम्हाला ट्रेंडी कपडे, स्टायलिश फुटवेअर आणि विविध ॲक्सेसरीज एकाच ठिकाणी मिळतील. खासकरून तरुणांसाठी हे मस्त शॉपिंग डेस्टिनेशन आहे.
८. डेक्कन जिमखाना – मिठाई, फुलं आणि भेटवस्तू
पारंपरिक गोडधोड, सुगंधी फुले, आणि देणग्यांसाठी वस्तू खरेदी करायच्या असतील तर डेक्कन जिमखाना हे ठिकाण एकदा जरूर भेट द्या.
९. लक्ष्मी रोड – साड्यांसाठी प्रसिद्ध
पैठणी, सिल्क, डिझायनर साड्या, पारंपरिक दागिने, पादत्राणे आणि सौंदर्यप्रसाधनं यासाठी प्रसिद्ध असलेला लक्ष्मी रोड म्हणजे खरेदीप्रेमींसाठी स्वर्गच!
१०. एम.जी. रोड
एमजी रोडवर मॉलपासून स्ट्रीट स्टॉल्सपर्यंत सगळं काही मिळतं. इथे तुम्ही वेस्टर्न वेअरपासून पारंपरिक भेटवस्तूंपर्यंत विविध गोष्टींची खरेदी करू शकता.