मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी झुकेन बर्ग यांनी त्यांच्या सोशल मिडीया खात्यावरुन मेटाच्या नव्या फिचरची ओळख करुन दिली आहे. मेटाच्या या नव्या फिचरमुळे आता विविध भाषांमध्ये रिल्सचे भाषांतर करता येणार आहे. मेटाच्या या नवीन फिचरमुळे अनेक क्रिएटर्सना त्यांचा कंटेंट विविध भाषिक लोकांपर्यंत पोहचवायला मदत होणार आहे.
झुकेन बर्ग यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये सांगितले आहे की, मेटा एआय वापरून विविध भाषांमध्ये भाषांतर करण्याचा पर्याय मेटाने लॉंच केला आहे. ज्यामध्ये सध्या हिंदी, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि इंग्रजी या भाषांमध्ये भाषांतर करता येईल. लवकरच इतर भाषा या फिचरमध्ये सामायिक करण्यावर काम सुरु आहे.
मेटाचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी सुद्धा त्यांच्या सोशल मिडीया खात्यावर नव्या फिचरची ओळख करुन देणारा व्हिडीओ केला आहे. ज्यात चालू वेळेला त्यांचा व्हिडीओ सुरुवातीला इंग्रजी आणि हळुहळू हिंदी, पोर्तुगीजमध्ये भाषांतरीत झाला. या फिचरमध्ये लिप सिंक हा पर्याय देखील दिला आहे. जे क्रिएटर्सच्या ओठांच्या हालचालींना भाषांतरित ऑडिओशी जुळवते. त्यामुळे प्रेक्षकांना व्हिडीओ भाषांतरीत असल्याचे जाणवणार नाही.
मेटाने इंस्टाग्राम आणि फेसबुकप्रमाणेच व्हॉट्स अपमध्ये सुद्धा नवे फिचर आणले आहेत. ज्यात व्हॉट्स अप वापरकर्त्ये चॅट्स वैयक्तिकृत करण्यासाठी मेटा एआय वापरून कस्टम चॅट थीम आणि व्हिडिओ कॉल बॅकग्राउंड तयार करू शकतात. तसेच चॅट स्विच न करता मदत मिळवण्यासाठी थेट मेटा एआय असिस्टंटकडे संदेश फॉरवर्ड करण्याची परवानगी सुद्धा मिळवता येणार आहे.