टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी !

मुंबई (प्रतिनिधी) : आजपर्यंत पोस्टमन काका घराच्या दारापर्यंत टपाल व मनिऑर्डरसह अन्य पत्रं आणून देत होता. आता, यापुढील काळात मात्र तो तुमच्या घराच्या दारातूनही टपाल घेऊन जाईल. तसेच, पार्सल, स्पीड पोस्टासह अन्य गोष्टी थेट घराच्या दारातून त्याच्याकडून स्वीकारले जाणार आहेत. ही नवी सोयी-सुविधा देशातील काही निवडक शहरांत सुरू झाली आहे. नंतर ती आता हळूहळू सुविधा देशातील अन्य शहरांत सुरू होईल.


दरम्यान, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमधील काही शहरे, जोधपूर (राजस्थान), हैदराबादसह प्रतापगड (उत्तर प्रदेश) यासह अन्य काही शहरांमध्ये सुरू झाली असून, लवकरच अन्य मोठ्या शहरांत ती सुरू केली जाणार आहे. एखादी वस्तू ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीची असेल, तर टपालवाहक (पोस्टमन) फक्त ५० रुपये सेवा शुल्क आकारणार आहे. त्यापेक्षा जास्त आर्टिकल्ससाठी शुल्कच आकारले जाणार नाही.


पोष्ट विभागाच्या या नव्या धोरणात्मक निर्णयामुळे पोस्ट विभागाकडून खासगी कुरिअर कंपन्यांना थेट स्पर्धा होेणार आहे. पोस्ट विभाग नवनवीन तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करताना दिसत आहे. अ‍ॅडव्हान्स्ड पोस्टल तंत्राचे नवे प्रोग्राम (सॉफ्टवेअर) प्रणाली सुरू केली आहे.


Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८