पालिकाच देणार मुंबईत परवडणारी घरे

पालिकेच्यावतीने मुंबईत ४२६ घरांसाठी निघणार लॉटरी


मुंबई (प्रतिनिधी) : सर्वसामान्य माणसांना मुंबईत घर घेणे शक्य व्हावे म्हणून महापालिकेने मुंबईचा विकास आराखडा तयार करून परवडणारी घरे बांधण्याचा संकल्प केल्यानंतर आता ही प्रत्यक्षात याचा लाभ मुंबईकरांना होणार आहे. आजवर मुंबईत म्हाडाच्यावतीनेच घरांची विक्री केली जात होती आणि यासाठी लॉटरी काढली जात होती. परंतु आता म्हाडा नव्हेतर महापालिकाच घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढणार असून येत्या दोन दिवसांमध्येही मुंबईतील विविध भागांमधील घरांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जाणार आहे.


मुंबईच्या २०१४-३४च्या विकास आराखड्यात परवडणारी घरे बांधण्यासाठी सर्वसामावेशक गृहनिर्माण धोरणांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबईत ४ हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या घरांच्या निर्मितीमध्ये महापालिकेला प्राप्त होणाऱ्या सदनिकांपैंकी २० टक्के सदनिका प्रकल्पबाधितांना आणि ८० टक्के सदनिकांची विक्री अल्प आणि अत्यल्प उत्पन गटातील लोकांना करण्याची तरतूद या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेला कांजूरमार्ग, विक्रोळी, भायखळा तसेच भांडुप आदी भागांमधील सदनिका प्राप्त झाल्या असून २० टक्के प्रकल्प बांधितांच्या सदनिका वगळता उर्वरित ८० टक्के म्हणजे ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या मालमत्ता खात्याच्यावतीने घेण्यात आला आहे.


या सर्व सदनिका ३०० चौरस फुटांच्या असून ज्या भागांमध्ये या सदनिका आहेत, त्यातील रेडीरेकनरच्या दहा टक्के अधिक दराने या सदनिकांची किंमत असेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये सर्वाधिक घरे ही भांडुप भागांमध्ये असून त्याखालोखाल इतर भागांमध्ये आहेत.


यासाठी अंत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाख आणि अल्प उत्पन्न गटातील व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ९ लाख आहे अशांनाच या लॉटरीत सहभागी होता येणार आहे. याबाबतच्या लॉटरीची जाहिरात दोन दिवसांमध्ये जाहीर होवून ऑनलाईन अर्ज करण्याचा कार्यक्रम प्रसिद्ध केला जाणार आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Major decision by MHADA : उमरखाडीतील १,९२८ रहिवाशांना मिळणार ५०० चौरस फुटांची हक्काची घरे!

मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य