'प्रहार' Stock Market: आठवड्याची अखेर जोरदार ! शेअर बाजारात बँक, हेल्थकेअर, फार्मा, रिअल्टी शेअर्समध्ये रॅली तर आयटीत मात्र नुकसान

मोहित सोमण: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकातील आठवड्याची अखेरही सकारात्मकच झाली. शेअर बाजारातील ही मूलभूत वाढ झाल्याने सेन्सेक्स ३३६.४७ अंकाने उसळत ८२५०८.५७ व निफ्टी १०५.५५ अंकांने उसळत २५२८५.३५ पातळीवर स्थिरावला आहे. आज दिवसभरात क्षेत्रीय निर्देशांकातील मजबूत कामगिरीसह पीएसयु बँक, फार्मा, रिअल्टी, हेल्थकेअर, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे आज सकारात्मक पातळीवर बाजार बंद झाला आहे. आयटी क्षेत्रातील घसरणीमुळे रॅली मर्यादित राहि ली आहे. दुसरीकडे बँक निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे आज बाजाराला आधारभूत पातळी गाठता आली आहे. तर मिड कॅप व स्मॉलकॅपमध्येही किरकोळ वाढ झाली आहे. जागतिक अस्थिरतेतही मजबूत फंडामेंटलमुळे, तसेच आगामी दुसऱ्या तिमाहीतील नि काल, जीएसटी कपात, व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून व घरगुती गुंतवणूकदारांकडून टिकवण्यात आलेली गुंतवणूक या आधारावर बाजाराला यश आले.


विशेषतः अस्थिरता निर्देशांक (VIX ) सकाळच्या सत्रात १ ते २% पातळीवर सुरू होता जो अखेरच्या सत्रात सपाट पातळीवर बंद झाला ज्याचाही फायदा बाजारात दिसला. काल बाजारात कंसोलिडेशन व नफा बुकिंग झाल्यामुळे आज मोठी रॅली बँक निर्देशांकात झाली. आगामी रेपो व्याज दर दरकपातवरील पैजा,विश्लेषकांचा शेअर बाजारावर सकारात्मक कौल, व युएस गाझा पट्टीतील समझोता यांचा एकत्रित परिणाम आज शेअर बाजारावर झाला आहे. कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही आज दिवसभरात घसरण झाली आ हे. सोन्याच्या बाबतही नवा ट्रिगर नसल्यामुळे आज सोन्यात घसरले होते.


संध्याकाळपर्यंत युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात संमिश्रित कौल काल प्रमाणे आजही कायम आहे. डाऊ जोन्स (०.०५%) वगळता एस अँड पी ५०० (०.२८%), नासडाक (०.०८%) निर्देशांकात घसरण कायम आहे. तर आशियाई बाजारातील अखेरच्या स त्रातही संमिश्र प्रतिसाद मिळत असून कोसपी (१.७०%) वगळता इतर बहुतांश निर्देशांकात घसरण झाली आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ टाटा कम्युनिकेशन (१०.२२%), रिलायन्स पॉवर (९.२९%), रेडिंगटन (८%), येस बँक (५.०७%), डॉ अग्रवाल (६.२६%), येस बँक (७.०५%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (५.९३%), ज्योती सीएनसी ऑटो (५.१०%), एल टी फूडस (३.९३ %), बंधन बँक (३.६९%), युको बँक (३.४८%), क्लीन सायन्स (३.३४%), सिप्ला (३.२२%), सीडीएसएल (३.००%), गोदरेज प्रोपर्टी (२.९७%), पंजाब नॅशनल बँक (२.५७%) समभागात झाली आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण हिंदुस्थान कॉपर (५.३८%), एथर एनर्जी (४.६८%), जीएमडीसी (३.७७%), मन्नपुरम फायनान्स (३.२३%), युनो इंडिया (३.१९%), हिंदुस्थान झिंक (२.७२%), सफायर फूडस (२.६०%), पीएनबी हाउसिंग (२.५७%), ग्लोबल हे ल्थ (१.८३%), सोनाटा सॉफ्टवेअर (१.६८%), आदित्य बिर्ला फॅशन (१.६३%), एल अँड टी फायनान्स (१.६१%), टाटा स्टील (१.४५%), विशाल मेगामार्ट (१.३३%), टीसीएस (१.०९%), आयसीआयसीआय लोंबार्ड (१.०६%), सीजी पॉवर (१.०२%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय बाजारांनी सत्राचा शेवट मजबूत पातळीवर केला, २५१६७ पातळीवर उघडल्यानंतर बेंचमार्क निफ्टी सातत्याने वर चढत राहिला आणि दिवसभर सकारात्मक गती राखली. प्रमुख क्षेत्रीय चालकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, रिअल्टी, फार्मा, खाजगी बँका आणि आरोग्यसेवेतील मजबूत वाढ यांचा समावेश होता, ज्यामुळे एकत्रितपणे वाढीच्या गतीला पाठिंबा मिळाला. तथापि, धातू आणि आयटी समभागांमध्ये निवडक नफा बुकिंग दिसून आली, ज्यामुळे या क्षेत्रातील वाढ मंदावली सार्वजनिक क्षेत्रातील बँका, रिअल्टी आणि फार्मामधील मजबूत खरेदीची आवड आजच्या तेजीला चालना देत होती, तर आरोग्यसेवा आणि खाजगी बँकांनी अतिरिक्त आधार दि ला. अलिकडच्या धावपळीत मोजमाप केलेल्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब म्हणून गुंतवणूकदारांनी नफ्यात अडकल्याने धातू आणि आयटी क्षेत्रांमध्ये काही प्रमाणात थंडावा दिसून आला. जागतिक आघाडीवर, भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या रचनात्म क संवादामुळे बाजारातील भावना मजबूत होण्यास मदत झाली, बाजारातील सहभागींमध्ये आशावाद आणि आत्मविश्वास वाढला. डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटने प्रगतीकडे स्पष्ट पूर्वाग्रह दर्शविला, आगाऊ-घसरण गुणोत्तर सकारात्मक मूव्हर्सना अनुकूल होते. विशेष म्ह णजे, डिव्हिस लॅबोरेटरीज, टाटा एलक्सी, पीजी इलेक्ट्रोप्लास्ट, हिंदुस्तान झिंक आणि एसबीआय लाईफ सारख्या नावांमध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आले, जे या काउंटरमध्ये नवीन सहभाग आणि व्यापारी स्थिती दर्शवते.'

Comments
Add Comment

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Local Train News : केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे; मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करते की त्यांनी केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे आणि

Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण

Latur Viral Video : वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना लोखंडी

Girija Raut Case : खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; निष्पक्ष चौकशीची मागणी

मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य