गणिताचे महत्त्व

करिअर : सुरेश वांदिले


गणितीय कौशल्यामुळे विविध व्यामिश्र समस्या अधिक साकल्याने समजून घेणे सुलभ जाते. विश्वाची रहस्ये शोधून काढण्यासाठी गणितीय सूत्रे आणि सिद्धांताचा सर्वाधिक उपयोग झाला आहे. गणित ही एकमेव वैश्विक भाषा असल्याचे समजले जाते. कोणताही देश-भाषा-प्रांत-संस्कृती यामध्ये गणितीय सूत्रे, सिद्धांत आणि व्याख्या बदलत नाहीत, त्यामुळे गणितज्ञ कोणत्याही देशात आणि प्रांतात सहजतेने कार्यरत राहू शकतो.


आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करण्यात गणिताने सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गणितीय सूत्रांचा वापर करून नवे शोध लावले जात आहेत. चंद्रावरील स्वारीपासून ते मंगळावर यान उतरवण्यापर्यंतची किमया गणितीय सूत्रे/प्रमेय/सिद्धांत यांच्या मदतीनेच मानवास शक्य होऊ शकली. जगातील सर्व उंच इमारतीचा पाया, हा गणितीय सिद्धांतांनी सिद्ध केल्यावरच पक्का होऊ शकला. संगणक, विमान वाहतूक, स्कॅनिंग, कोडिंग, सॉफ्टवेअर, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी क्षेत्रांचा विस्मयकारक विकास हा गणितामुळेच होऊ शकला.


मानवी मेंदूचा विश्लेषणात्मक विकास करण्यात आणि त्याला अधिक सक्षम करण्यात गणिताची मदत होत असल्याचे, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. तान्या इव्हान्स यांनी त्यांच्या संशोधनाद्वारे दाखवून दिले. गणितावर प्रभुत्व मिळवल्यास कोणतीही समस्या सोडवण्याचे कौशल्य हे अधिकाधिक प्रगत होत असल्याचे अभ्यासकांना दिसून आलेय. गणितज्ञ जेव्हा समस्या सोडवतात, तेव्हा त्यात स्पष्टता असते. अधिक चांगल्या तऱ्हेच्या कार्यपद्धतीसुद्धा यातून विकसित होतात.


(१) मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायन्स या अभ्यासक्रमांतर्गत गणित विषयात स्पेशलायझेशन करता येते. संपर्क-cbs.ac.in
(२) बेंगळुरु स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स येथे, बी.एस (बॅचलर ऑफ सायन्स-रिसर्च) इन मॅथेमॅटिक्स हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, जेइइ मेन/ ॲडव्हान्स्ड परीक्षा आणि आयसर (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन ॲण्ड रिसर्च ) ॲडमिशन टेस्टचे गुण ग्राह्य धरले जातात. संपर्क- ug.iisc.ac.in/math.
(३) कोलकाता स्थित इंडियन स्टॅस्टिकल इंस्टिट्यूट या संस्थेचा, बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम बेंगळुरु कॅम्पस यथे करता येतो. तीन वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. निवड- संस्थेच्या चाळणी परीक्षेद्वारे. संपर्क- isical.ac.in/admission,
(४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकशेन ॲण्ड रिसर्च या संस्थेतील बीएस-एमएस या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांतर्गत स्पेशलायझेशनसाठी गणित हा विषय निवडता येतो. संपर्क- iiser.ac.in,
(५) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकशेन ॲण्ड रिसर्च भुवनेश्वर या संस्थेतील इंटिग्रेटेड एमएस्सी या अभ्यासक्रमांतर्गत गणित विषयात स्पेशलायझेशन करता येते.
संपर्क - niser.ac.in,
(६) चेन्नई मॅथेमॅटिकल इंस्टिट्यूट येथे बीएस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स, बी.एस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स आणि बी.एस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड फिजिक्स हे प्रत्येकी तीन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम करता येतात. निवड चाळणी परीक्षेद्वारे.
(७) इंस्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स ॲण्ड ॲप्लिकेशन भूवनेश्वर - या संस्थेत, बीएस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड ॲप्लिकेशन हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे एक केंद्र मुंबई येथे आहे. अर्हता- बारावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयांचा अभ्यास केलेला असावा. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या १५ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना, भारत सरकारच्या, नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्समार्फत वार्षिक ६० हजार रुपयांची, शिष्यवृत्ती दिली जाते. संपर्क - https://iomaorissa.ac.in
(८) एनआयटी रुरकेला- इंटिग्रेटेड एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. संपर्क-https://nitrkl.ac.in.

Comments
Add Comment

थिएटर नाही; तर वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहातच लावले चित्रपटाचे शो!

‘कुर्ला टू वेंगुर्ला’चे सर्व शोज हाऊसफुल्ल माती आणि नाती जोडणारा सिनेमा असे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, तो

अभिनेते अजय पूरकर साकारणार खलनायक

नायकाप्रमाणे क्रूर खलनायकही चित्रपटांत गाजलेत! याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले कलाकार आता नकारात्मक पात्र

तीन दिवसांचा माणिक स्वर महोत्सव

महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका, पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी (२०२५–२०२६) वर्षानिमित्ताने देशभरात

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा कल

'बालिका वधू'ची आनंदी विवाहबंधनात! लग्नानंतर 'सिंदूर-मंगळसूत्र' लूकमध्ये पतीसोबत दिसली

टीव्ही अभिनेत्री अविका गोर आणि मिलिंद चंदवाणी अडकले विवाहबंधनात; राष्ट्रीय टीव्हीवर होणार प्रसारण मुंबई:

'फिर से गुड न्यूज' भारती आणि हर्षने खास पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी!

मुंबई : आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि