माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात येत्या आठवड्यात बैठक घेणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांनी आज दिली.


आज मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या अशा माहिम किल्ला परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिका हेरिटेज विभागातील कन्सल्टंट तसेच मुंबई पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


माहिमचा किल्ला ही मुंबईतील अतिशय पुरातण वास्तू असून तेराव्या शतकामध्ये राजा बिंबाराजाने बांधलेलं हे स्ट्रक्चर आहे. चौदाव्या शतकामध्ये गुजरातच्या सुलतानाने त्यावर हल्ला केला. आणि मग सोळाव्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी या ठिकाणी हा किल्ला उभा केला, तो आजचा हा माहिमचा किल्ला म्हणून ओळखला जातो. इथून जवळच बांद्रयाचा किल्ला आहे आणि वरळीचा किल्ला सुद्धा बाजूलाच आहे.


या वास्तूमध्ये वर्षानुवर्ष खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं जात होतं. मुंबई महापालिकेने या ऐतिहासिक वास्तूला अतिक्रमणापासून मुक्त करण्याचं काम केले..त्यामुळे माहिमचा किल्ला आज मोकळा श्वास घेतो आहे. आता यापुढे किल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभिकरण करण्यात येणार असून मुंबई महापालिका आणि त्यांचे कन्सल्टंट, पुरातत्व खात्या तर्फे हे काम करण्यात येणार आहे.


जवळजवळ एक एकर मध्ये असलेला हा पूर्ण किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली दोन एकरची मोकळी आणि अन्य जागा, असा तीन एकर समुद्रकिनारा असलेला हा परिसर आहे. ज्याला पोर्तुगीजांनी त्या वेळेला बांधलेलं आणि मूळ स्ट्रक्चरमध्ये सापडलेले अवशेष जे राजा बिंबाच्या काळापासूनचे आहेत ते सुद्धा याच भागामध्ये अजूनही अस्तित्वात आहेत. या सगळ्यांचा एकत्रित विकासाचा कार्यक्रम, धोरण आणि योजना मुंबई महानगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये संपूर्णता करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असेही आशिष शेलार यांनी जाहीर केले. या विषयामधली एक बैठक मंत्रालयामध्ये येत्या आठवड्यातच घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.


मुंबईकरांना विकासाच्या प्रगतीबरोबर आपली विरासत असलेल्या गोष्टींची सुद्धा इत्थंभूत माहिती, व सुविधा देणे हेच धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं त्याला सहकार्य आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्याबद्दल सहकार्य करायचं ठरवलंय. पुरातत्व विभाग त्याबरोबर काम करणार आहे, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत