मोह


आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य


माणूस जन्माला आला की त्याचे आयुष्य सुरू होते ते अगदी मरेपर्यंत. त्या आयुष्याच्या प्रवासात अनेक सुखदुःखाचे क्षण येतात. आयुष्याच्या प्रवासात अनेक अडचणी, अडथळे येत असतात. अनेकदा अवघड परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आपले मन भांबावून जाते. भांबावलेल्या क्षणी मन थाऱ्यावर नसतं. अवघड परिस्थितीतून कसा मार्ग काढावा याचाच सतत विचार सुरू होतो. अवघड परिस्थिती मग ती मानसिक किंवा आर्थिक परिस्थितीची पण असू शकते, अशावेळी मोहाचे क्षणही समोर येतात. मोह म्हणजे भूरळ पाडणारा क्षण.


माणसाला कधी पैशाची, संपत्तीची, सोन्या नाण्याची किंवा प्रसिद्धीचे इ. प्रकारचे अनेक भुरळ घालणारे विचार मनात येतात आणि मग असं वाटायला लागतं की, एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे असे आपले मन आपल्याला सांगू लागतं आणि नकळत आपण मोहाच्या जाळ्यात सापडतो. अशा वागणुकीमुळे आपण कधी त्या मोहाच्या जाळ्यात अडकतो तेच आपल्याला समजत नाही. आपण एवढे त्यात गुंतत जातो की, आता कुठे थांबावं हेच कळत नाही. मन आणि बुद्धी त्या क्षणी दोन्हीही हतबल होते. खरे तर परिस्थितीने आपल्याला ती वाट दाखवलेली असते; परंतु आता या मोहापासून कसे दूर जावे तेच कळत नाही. पण यातूनच खोटे बोलणे, फसवणूक करणे, लबाडी करणे, गंडा घालणे इ. सारखे गुन्हे घडण्यास सुरुवात होते.


मोहमायेच्या खेळात सारेच जण अडकले आहेत. पण हे सारं काही खोटं आहे. आपल्याला माहीत आहे की जे आपण मिळवत आहोत किंवा मिळवणार आहोत हे सर्व नश्वर आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मनुष्य सुखाच्या शोधात आहे. नोकरी, संसार या सर्व गोष्टींमध्ये गुरफटून गेला आहे. पण या सर्वांचा विचार करायला त्याच्याजवळ वेळ कुठे? सारं काही इथेच ठेवून जायचं आहे. काही सोबत घेऊन जाता येणार नाही हे माहीत असून सुद्धा मोह काही सुटता सुटत नाही. या मोहमायेमुळे मोक्ष मिळत नाही. मन कायम अतृप्त इच्छा, भावना घेऊन जगत असतं आणि एके दिवशी अचानक मरण पावतो; परंतु सतत मोहमायात अडकल्याने मृत्यूनंतरचा प्रवासही सुखकर होत नाही. ८४ लक्ष योनीच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा तो जीव अडकत जन्म घेतच राहतो.


मागच्या जन्माचे हिशोब चुकते करता करता पुन्हा नवीन मोहाच्या पाशात अडकून पडतो. हे चक्र थांबत नाही. अविरत चालूच राहते. हे घडते ते फक्त मोहामुळे, मनाला आवर न घालता आल्यामुळे. त्यामुळे प्रत्येक कृती करताना पूर्ण विचारांती करावी किंवा घरातील ज्येष्ठांना विचारात घ्यावे किंवा चांगल्या मित्र-मैत्रिणींचा सल्ला घ्यावा. घरात चर्चा करावी आणि सर्वांच्या विचारांती निर्णय घ्यावा.


Comments
Add Comment

ज्ञानाचे मर्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै  सगळ्या ठिकाणी ज्ञान हे कार्य करते व त्याच्याच वापरांतून प्रयोगांतून मिळणारे

चित्ताची एकाग्रता

आत्मज्ञान : प्राची परचुरे - वैद्य आजच्या तंत्रज्ञानप्रधान धावपळीच्या युगात माणसाचे चित्त खूपच अस्थिर झाले आहे.

महर्षी भारद्वाज

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी आपल्या देदिप्यमान तेजाने आसमंतात अखंड झळकणाऱ्या सप्तर्षींपैकी एक ऋषी म्हणजे

माँ नर्मदा... एक अध्यात्मिक परिक्रमा!!

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे!! आजच्या भागात आपण नर्मदा परिक्रमा कोणकोणत्या

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

कधी आहे कालभैरव जयंती? महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भगवान कालभैरव