महामुंबईची भटकंती आता एकाच तिकिटावर


एकाच 'मुंबई वन'ॲपमध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट


मुंबई : मुंबईसह उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आणि ऐतिहासिक सुविधा सुरू होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात प्रवास करणाऱ्यांना आता बस, मेट्रो, लोकल आणि मोनोरेलसाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याची गरज राहणार नाही. महामुंबईची भटकंती आता एकाच तिकिटावर करता येणार आहे. ‘मुंबई वन’ असे या ऑनलाइन तिकीट ॲपचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी या ॲपचे उद्घाटन झाले आहे.


आतापर्यंत प्रवाशांना बस, मेट्रो, लोकल आणि मोनोरेल यासाठी स्वतंत्र म्हणजेच वेगवेगळी तिकिटे काढावी लागत होती. मात्र आता ‘मुंबई वन’ ॲपच्या मदतीने संपूर्ण महामुंबई क्षेत्रात एका डिजिटल तिकिटावर प्रवास करता येणार आहे. या ॲपमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली या भागांचा समावेश आहे. वसई-विरार, पालघर आणि कल्याणपुढील भाग यातून वगळण्यात आला आहे. या ॲपमुळे ११ सार्वजनिक वाहतूक ऑपरेटर उपनगरीय रेल्वेसह एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील.


मुंबई वन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मुंबईतील विविध सार्वजनिक परिवहन यंत्रणांसाठी (पीटीओ) ऑन-डिमांड परिवहन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. मल्टी-मोडल मोबिलिटी मॅनेजमेंट प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी सर्वत्र उपलब्ध असलेल्या डिजिटल सुविधा मिळतात. हे ॲप प्रवाशांना त्यांच्या नियोजित प्रवासासंबंधी महत्त्वाच्या अद्यतनांची रिअल-टाईम सूचना प्रदान करते, ज्यामध्ये पर्यायी मार्गांची माहितीही समाविष्ट असते. अशी माहिती आधीच मिळाल्याने प्रवाशांना योग्य निर्णय घेता येतात आणि आपल्या प्रवासाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येते. मुंबई वन अॅपऑक्टोबर रोजी पहाटेवाजल्यापासून डाउनलोडवापरासाठी उपलब्ध असणार आहे



आता या भागासाठी एकच तिकीट पुरेसे ठरणार


उपनगरीय लोकल ट्रेन सेवा, बेस्ट, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि मिरा-भाईंदर महापालिकांच्या बससेवा, मेट्रो लाईन १, २ए,, ७, ३, मोनोरेल सेवा (चेंबूर ते सात रस्ता) आणि नवी मुंबई मेट्रो.


Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.