मुंबई (खास प्रतिनिधी) : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईची लोकसंख्या २०२५मध्ये १ कोटी ३१ लाख ०७ हजार १७७एवढी असल्याची समोर आली आहे. २०२४मध्ये ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार
लोकसंख्येची आकडेवारी १ कोटी ३० लाख ६० हजार ७८१ एवढी होती. एक वर्षांत मुंबईतील लोकसंख्या ४६ हजारांनी वाढल्याचे अहवालातील आकडेवारीनुसार समोर येत आहे.
मुंबईचे क्षेत्रफळ व त्यातील लोकसंख्या २०२४-२५ चा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालाचा आधार देत पालिकेचा पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, मुंबईचे क्षेत्रफळ जे ४३७ चौरस किलोमीटर होते, ते आता ४८३.२२ चौरस किलोमीटर एवढे आहे. यामध्ये २०२३-२०२४ मध्ये १ कोटी ३० लाख ६० हजार ७८१ लोकसंख्या होती, जी २०२४-२५ मध्ये १ कोटी ३१ लाख ७हजार १७७ एवढी असल्याची नोंद झाली आहे.
सर्वाधिक लोकसंख्या ही मालाड परिसरात ९ लाख ९१ हजार ६६५ एवढी आहे, तर सर्वाधिक कमी लोकसंख्या बी विभागात आहे. बी विभागात १ लाख ३४ हजार ९१ एवढी लोकसंख्या आहे. त्यामुळे एका वर्षांत ४६ हजार लोकसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
सन २०२५ मध्ये मुंबईचे क्षेत्रफळ व लोकसंख्या
मुंबईचे एकूण क्षेत्रफळ : ४८३.२२ चौरस किलोमीटर
मुंबईची एकूण लोकसंख्याः १ कोटी ३१ लाख ०७ हजार ७७१
मुंबई शहर एकूण क्षेत्रफळ ७२.०१ चौ.कि.मी., (लोकसंख्याः ३२,५०,२६६ः)
पश्चिम उपनगराचे क्षेत्रफळ २३२.५५ चौ.कि.मी., (लोकसंख्याः ५८,२२,३३९)
पूर्व उपनगराचे क्षेत्रफळ १७८.५७ चौ.कि.मी. (लोकसंख्याः ४०,३४,५७२ )