ITI Share Surge: १४% उसळी घेतलेला ITI Ltd शेअर नक्की आहे काय? कुठल्या कारणामुळे शेअर All time High जाणून घ्या

मोहित सोमण:भारत सरकारच्या उपक्रमांअंतर्गत (Government of India Undertaking)असलेली छोटी कंपनी आयटीआय लिमिटेड कंपनीच्या शेअरने आज मोठी उसळी घेतली आहे. आज दिवसभरात इंट्राडे उच्चांकावर (All time High) वर ट्रेडिंग क रत होता. आज दिवसभरात १४% पातळीपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये व्यवहार झाले आहेत. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच या शेअरमध्ये ११% उसळी घेतली होती. दुपारी ३.३० वाजता सत्र बंद होताना कंपनीचा शेअर १३.२२% उसळत ४२.८५ रूपये प्रति शेअर वर बंद झाला आहे.आज आयटीआयच्या सर्वात मोठ्या क्लायंटपैकी एक असलेल्या भारत संचार निगम (BSNL) ने भारतात 5G तंत्रज्ञानाकडे संक्रमणाला गती देण्याची योजना जाहीर केल्यानंतर आयटीआय लिमिटेडने एनएसईवर दुपारी २ वाजेपर्यंत वाजेपर्यंत ५४७.६५ लाख शेअर ट्रेडिंग व्हॉल्यूमची नोंद केली आहे आकडेवारीनुसार,जी दोन आठवड्यांच्या सरासरी दैनंदिन शेअर्सच्या ६.०५ लाख शेअर्सपेक्षा ९०.४७ पट जास्त आहे.


या शेअर्समध्ये मोठी रॅली होण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलीकडेच घोषणा केली की भारत संचार निगमचे स्वदेशी विकसित 4G नेटवर्क पुढील सहा ते आठ महिन्यांत 5G अपग्रेडसाठी नियोजित आहे.आयटीआय कंपनी प्रामुख्याने टेलिकॉम उपकरणे प्रदान करण्यातील एक महत्वाची कंपनी समजली जाते आणि बीएसएनएलच्या स्वदेशी 4G नेटवर्कवरून 5G वर अपग्रेड केल्याने त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.आयटीआयने उच्च ट्रेडिंग व्हॉल्यूममुळे मजबूत वाढीचा ट्रेंड अनुभवला आहे. त्यामुळे डिसेंबर २०२४ नंतर व्हॉल्यूम सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांत स्टॉकमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे हे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.कंपनीला विविध राज्यांमध्ये ऑर्डर आणि करार मिळाले आहेत, ज्यामध्ये भारतनेट प्रकल्पासाठी बीएसएनएलकडून १९०१ कोटी, तसेच ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये ८८ कोटींचे ऑर्डर आणि आयटी आणि नेटवर्क पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित करार यांचा समावेश आहे. या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम स्टॉकचा ९० % हिस्सा सरकारकडे आहे, तर स्पेशल नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंडकडे ८% हिस्सा आहे.


प्रसारमाध्यमांशी बोलताना, सेबी-नोंदणीकृत विश्लेषक फायनान्शियल सार्थिस यांनी नमूद केले की हा स्टॉक २६ मे रोजी तयार झालेल्या मदर कॅन्डलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ३६९ वरील निर्णायक बंद ४०० रूपये प्रति शेअरसाठी दरवाजे उघडू श कतो आणि एकदा ४०० ओलांडले आणि टिकून राहिले की, पुढील लक्ष्य क्षेत्र (Target Zone) ४५० आणि ५०० आहेत. नकारात्मक बाजूने (On Negative Side) २७५–२८० रूपयांच्या आसपास मजबूत आधार ओळखला जातो.आयटीआयच्या शेअर्समध्ये (Ye ar to Date YTD) बेसिस वर वर्षभरात ५% घट झाली आहे बेसिसवर गेल्या सहा दिवसांत, आयटीआयने मजबूत वाढीकडे कल दर्शवला आहे, या कालावधीत १७.२% चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. या शेअरने त्याच्या क्षेत्रापेक्षा ७.८३% ने चांग ली कामगिरी केली आहे, जी त्याच्या समकक्षांच्या तुलनेत चांगली कामगिरी दर्शवते. याव्यतिरिक्त, आयटीआय सध्या त्याच्या ५-दिवस, २०-दिवस, ५०-दिवस, १००-दिवस आणि २००-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त व्यापार करत आहे, जे सकारात्मक गती दर्शवते.


गुंतवणूकदारांच्या सहभागातही वाढ झाली आहे, ७ ऑक्टोबर रोजी ५.५९ लाख शेअर्सचे वितरण प्रमाण, ५-दिवसांच्या सरासरीच्या तुलनेत २१५.६७% वाढ दर्शवते. ३१,१७६ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह, आयटीआय लिमिटेड मजबूत तरलता प्रदर्शित क रत आहे, ज्यामुळे ते दूरसंचार क्षेत्रातील एक महत्वाची संस्था बनण्यासाठी मार्गक्रमण करत आहे असे मानले तर वावगे ठरणार नाही. एकूणच, आजच्या स्टॉकची कामगिरी त्याच्या सक्रिय व्यापार स्थिती आणि सकारात्मक बाजार भावना अधोरेखित करते.

Comments
Add Comment

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी डॉक्टरांची SIT चौकशी

Ashok Kharat : नाशिकमधील अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी ईडीमार्फत सुरू असून, पोलिस अधीक्षक सातपुते

IRCTC : वाट कसली बघताय बॅगा भरा, आयआरसीटीसीकडून 'दिव्य दक्षिण यात्रा', भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC : भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड (IRCTC), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या

Chief Minister Devendra Fadnavis : ९४ टक्के परदेशी कर्ज एका दिवसात फेडण्याची भारताची क्षमता!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; जागतिक मंदीचे वातावरण असतानाही भारताचा विकासदर ७ टक्क्यांहून अधिक मुंबई : "जागतिक

Jack Crawley : इंग्लंडच्या स्टार फलंदाजाचा मोठा निर्णय ! कसोटी संघातून वगळल्यानंतर रेड-बॉल क्रिकेटमधून घेतला ब्रेक; आता फक्त टी-२० कडे लक्ष्य

लंडन : इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली याने आपल्या क्रिकेट करियरातील सर्वात मोठा निर्णय घेतला. गेल्या काही

Satana : कपडे वाळत टाकताना भयानक घडलं, आईचा मृत्यू तर १० वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला

Satana : सटाणा शहरातील अहिल्यादेवी चौक परिसरातील आसरा माता मंदिरासमोरील अहिल्यानगर भागात गुरुवारी एक अत्यंत

Mumbai unauthorized schools : दक्षिण मुंबईतील शाळा अनधिकृत; शिक्षण निरीक्षकांकडून टाळे ठोकण्याचे आदेश

MUMBAI : दक्षिण मुंबईतील नामांकित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि त्यांमधील काही