Indian Navy : एडनच्या आखातात भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्रातील आपली ताकद सिद्ध करत मोठ्या समुद्री चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मंगळवारी रात्री एडनच्या आखातात भारतीय युद्धनौका आयएनएस त्रिकंडने तत्परता आणि चातुर्य दाखवत एका मालवाहू जहाजाची समुद्री चाच्यांच्या तावडीतून यशस्वीरित्या सुटका केली.



सूत्रांच्या माहितीनुसार, समुद्री चाच्यांनी ज्या जहाजावर हल्ला केला होता, त्या मालवाहू जहाजाचे नाव एमव्ही गोल्डन आर्सेनल आहे. या व्यावसायिक जहाजावर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक माल (कार्गो) होता. विशेष म्हणजे, या जहाजाच्या चालक दलात एक भारतीय नागरिकही कार्यरत होता.माहितीनुसार, हल्ला होताच जहाजाच्या चालक दलाने प्रसंगावधान राखले. समुद्री चाच्यांनी जहाजाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करताच चालक दलातील सदस्यांनी स्वतःला जहाजातील सुरक्षित कक्षात बंद करून घेतले. त्यानंतर त्यांनी रेडिओ संप्रेषण प्रणालीद्वारे भारतीय नौदलाशी संपर्क साधून हल्ल्याची माहिती दिली आणि तातडीने मदतीची विनंती केली.



संकटाचा संदेश मिळताच जवळच तैनात असलेली आयएनएस त्रिकंड ही भारतीय युद्धनौका तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाली. भारतीय युद्धनौका आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच आणि भारतीय नौदलाच्या धाकामुळे समुद्री चाच्यांनी तेथून पळ काढला.चाचे पळून गेल्यानंतर भारतीय नौदलाच्या मार्कोस (मरीन कमांडो) पथकाने जहाजावर उतरून संपूर्ण जहाजाची कसून तपासणी केली. जहाजावर कोणताही समुद्री चाचा लपलेला नाही किंवा कोणताही धोका शिल्लक नाही, याची त्यांनी खात्री करून घेतली.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी