वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप यांसारख्या समस्या जाणवतात. अशा वेळी अनेकजण आपल्याजवळ वेदनाशामक औषधांचा साठा ठेवतात, जेणेकरून लागल्यास त्यांचा उपयोग करून लगेच आराम मिळवता येईल. परंतु ही सवय चांगली नाही, कारण किरकोळ वेदनांवरही जर पेन किलर घेत राहिलात, तर भविष्यात याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.


आजकालच्या जलद जीवनशैलीत अनेकांना स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. दुखू लागल्यावर वेदनाशामक औषधांचा वापर करून दुखणं तात्पुरते थांबवण्याची सवय नेहमीच असते. पण, हे करणं अत्यंत चुकीचं आहे. विशेषतः थंडीच्या दिवसांत डोकेदुखी किंवा अंगदुखी होत असताना लगेच पेन किलर घेणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.


वेदनाशामक औषधांचा वापर हानिकारक आहे. जर तुम्ही पेन किलर वारंवार घेत असाल, तर यामुळे अनेक आरोग्यसमस्यांचा सामना करावा लागतो.


अपचन:
तज्ज्ञांच्या मते, पेन किलरचे अति सेवन केल्यास पोटाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. गॅस, ॲसिडिटी, अल्सर आणि गॅस्ट्रिक रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.


किडनीच्या समस्या:
पेन किलरचे वारंवार सेवन केल्याने किडनीमध्ये त्याचे बारीक कण जमा होऊ शकतात, ज्यामुळे किडनी स्टोन, किडनी निकामी होणे यांसारखी गंभीर आजार होण्याची शक्यता असते.


स्नायू कमकुवत होणे:
सतत पेन किलर घेतल्याने स्नायू कमकुवत होतात आणि हृदयाचे अनियमित ठोके आणि थकवा यासारखी लक्षणे दिसू शकतात, जे थंडीत अधिक तीव्र होऊ शकतात.


म्हणूनच, पेन किलरचे सेवन शक्यतो टाळा आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांपासून वाचण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घेतले पाहिजे.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि