आधी साठ कोटी जमा करा, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

व्यावसायिक राज कुंद्रा आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी या दोघांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई सुरू असेपर्यंत देशाबाहेर जाण्यास राज आणि शिल्पा या दोघांना मनाई करण्यात आली आहे. पण परदेशी जाणे आवश्यक आहे असा पवित्रा घेत शिल्पाने न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. या विनंती अर्जावर सुनावणी घेतल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पाला आधी साठ कोटी रुपये न्यायालयीन कस्टडीत जमा करा, असा आदेश दिला. या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे अथवा पैसे न्यायालयीन कस्टडीत जमा करणे हे दोनच पर्याय राज आणि शिल्पा यांच्याकडे आहेत.


पोर्नोग्राफी, आर्थिक अफरातफर अर्थात मनी लाँडरिंग असे गंभीर आरोप असल्यामुळे राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी न्यायालयाच्या कचाट्यात सापडले आहेत. या प्रकरणात दिलासा मिळावा यासाठी शिल्पाने उच्च न्यायालयात दाद मागितली. पण शिल्पाचा हा प्रयत्न अयशस्वी झाला आहे.


मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांविरोधात लूकआऊट नोटीस अर्थात दिसताक्षणी अटक करण्यासाठी वॉरंट काढले आहे. यामुळे दोघेही न्यायालयीन परवानगी शिवाय परदेशी जाऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर एका इव्हेंटचे कारण देत शिल्पा शेट्टीने २५ ते २९ ऑक्टोबर या काळात कोलंबोला जाण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. फोनवरुन आमंत्रण मिळाले आहे असे कारण देत आमंत्रण पत्रिका सादर करणे अशक्य आहे, असेही शिल्पाच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पाला आधी साठ कोटी रुपये न्यायालयीन कस्टडीत जमा करा, असा आदेश दिला.


नेमके काय आहे प्रकरण ?


राज आणि शिल्पा यांनी अपुरी माहिती देत दिशाभूल केली आणि ६० कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडले अशी तक्रार दीपक कोठारी यांनी केली. या तक्रारीचा तपास करुन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने राज आणि शिल्पा विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली. दोघांविरोधात लूकआऊट नोटीस काढण्यात आली. यामुळे परदेशी जाणे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीसाठी अशक्य झाले. या पार्श्वभूमीवर शिल्पा शेट्टीने न्यायालात दाद मागितली आहे. परदेशी जाण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शिल्पा प्रयत्न करत आहे. पण उच्च न्यायालयाने अद्याप शिल्पाला दिलासा दिलेला नाही.

Comments
Add Comment

इन्स्टा स्टार मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार ?

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यातच उमेदवार म्हणून मिथिलामधून

'दशावतार' चित्रपटाचे रिषभ शेट्टीने केले कौतुक! म्हणाला, असे चित्रपट पुढील पिढीसाठी दस्ताऐवज आहेत

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी सध्या आपल्या कांतारा चॅप्टर १ या नवीन चित्रपटामुळे

रेणुका शहाणेचा ५९ वा वाढदिवस, दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा!

मुंबई : सलमान खानसोबत पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी मराठी

कांतारा चॅप्टर १ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात जबरदस्त कमाई

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी

दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास, ओटीटीवर स्त्रीशक्तीचा उत्सव

दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास – नवरात्रीत मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीशक्तीच्या नऊ रूपांचा अल्ट्रा झकास ओटीटीवर

तुकारामांची आवली स्मिता शेवाळे ‘अभंग तुकाराम’मध्ये दिसणार

मुंबई : नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या विविध रूपांची उपासना करताना आवलीसारख्या स्त्रियांची आठवण