ब्रिटनच्या पंतप्रधानांचे मुंबईत आगमन; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

मुंबई : भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्मर यांचे स्वागत केले.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


पंतप्रधान म्हणून स्टार्मर यांचा हा पहिला अधिकृत भारत दौरा असून, हा दौरा भारत-ब्रिटन संबंधांना नवी दिशा देणारा ठरणार आहे.



पंतप्रधान मोदी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईत ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे स्वागत करतील. त्यानंतर दोन्ही देशांचे पंतप्रधान दुपारी १:४० वाजता मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित 'सीईओ फोरम'ला उपस्थित राहतील. तसेच, दुपारी २:४५ वाजता ते सहाव्या ग्लोबल फिनटेक महोत्सवात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करतील.


धोरणात्मक भागीदारीचा 'व्हिजन २०३५' आराखडा


या भेटीदरम्यान, दोन्ही नेते 'व्हिजन २०३५' या पथदर्शी आराखड्याच्या अनुषंगाने भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतील. व्हिजन २०३५ हा व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित केलेला १० वर्षांचा कालबद्ध मार्गदर्शक आराखडा आहे.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले