Stock Market Update Marathi: सलग तिसऱ्यांदा सकाळच्या सत्रात वाढ सेन्सेक्स निफ्टी किरकोळ वाढला मात्र 'ही' सल कायम !

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेच्या काळातही आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सलग तिसऱ्यांदा ही वाढ झाली असून प्रामुख्याने मजबूत फंडामेंटलमुळे नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलण्यास बाजार यशस्वी ठरत असले तरी तांत्रिकदृष्ट्या गुंतवणूकदारांना तितकासा परतावा अथवा तितकी रॅली निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात होताना दिसत नाही. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २६.९७ अंकाने व निफ्टी ३४.६५ अंकाने उसळले आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशाकांतही सुरूवाती च्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात बहुतांश निर्देशांकात किरकोळ वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ मेटल (०.४०%), आयटी (०.३०%), एफएमसीजी (०.१५%), तेल व गॅस (०.६४%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (० .५५%) निर्देशांकात झाली असून घसरण हेल्थकेअर (०.१८%), पीएसयु बँक (०.०८%), प्रायव्हेट बँक (०.०२%) निर्देशांकात घसरण झाली आहे.


काल युएस बाजारात मोठ्या प्रमाणात आयटी शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या रॅलीचा फायदा आज सुरूवातीच्या कलात आयटी शेअर्सला होताना दिसत असला तरी अखेरच्या सत्रात ही रॅली कायम राहते का हे ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपसह मिड स्मॉल कॅप शेअर्स वर अवलंबून असेल‌. जागतिक कमोडिटी बाजारातील दबावामुळे आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आपली रोख निव्वळ गुंतवणूक बाजारातून काढतात का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. जीएसटी कपातीचा फायदा व्यापक निर्देशांकात होत असला तरी आगामी दुसऱ्या तिमाहीतील घडामोडी क्षेत्रीय विशेष निर्देशांकांना नवे वळण देईल.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ ब्रिगेड एंटरप्राईजेस (२.३७%), गोदरेज अँग्रोवेट (१.१७%), अतुल (१.६८%), बँक ऑफ इंडिया (१.४०%), गो डिजिट जनरल (१.३७%), डोम इंडस्ट्रीज (४.९६%), एमआरपीएल (३.२१%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (३.०२%), मेट्रोपॉ लिस हेल्थ (२.९९%), अदानी ग्रीन (२.५२%), महानगर गॅस (२.०१%), बजाज फायनान्स (१.५३%) समभागात वाढ झाली आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण ट्रेंट (२.४३%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (२.१३%), पीटीसी इंडस्ट्रीज (२.०३%), सिटी युनियन बँक (२.७९%), एम अँड एम फिनसर्व्ह (१.४३%), जे एम फायनांशियल (१.४१%), बीएसई (१.०१%), इंटरग्लोब एव्हिऐशन (०.९ ७%), अँक्सिस बँक (०.८७%), टीसीएस (०.७९%) समभागात झाली आहे.


सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलावर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'बाजारात सुरू असलेल्या सौम्य तेजीला वेग येण्याची शक्यता आहे. भारतातील एफआयआयची विक्री हळूहळू कमी होत आहे कारण इतर बाजारपेठांमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे त्यांचे मूल्यांकन वाढले आहे आणि भारत आणि इतर बाजारपेठांमधील मूल्यांकनातील तफावत कमी झाली आहे. काल एफआयआय विक्रीचा आकडा फक्त ३१३ कोटी रुपये होता आणि डीआयआयने ५०३६ कोटी रुपयांच्या मोठ्या खरेदीने तो पूर्णपणे मागे टाकला. म्युच्युअल फंडांमध्ये स्थिर गुंतवणूक, विशेषतः एसआयपी गुंतवणूक, बाजाराला एक मजबूत आधार आहे. अर्थसंकल्पातील उत्पन्न कर कपात, जीएसटी कपा त आणि कमी व्याजदर व्यवस्थेचा एकत्रित परिणाम भारताच्या जीडीपी वाढीला लवचिकता देऊ शकतो आणि आर्थिक वर्ष २७ मध्ये कॉर्पोरेट कमाई सुमारे १५% पर्यंत वाढू शकते. बाजार लवकरच यावर सवलत देण्यास सुरुवात करेल. गुंतवणूकदारांसाठी सका रात्मक होण्याची वेळ आली आहे. बाजारात मोठी शॉर्ट पोझिशन असल्याने कोणतीही सकारात्मक बातमी शॉर्ट-कव्हरिंगला चालना देऊ शकते, ज्यामुळे तेजीला आणखी मदत होऊ शकते.'

Comments
Add Comment

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास

Stock Market News: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची सातत्याने विक्री असूनही शेअर बाजाराची या आठवड्यात तेजीच

वृत्तसंस्था:परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, तिमाहीतील मिश्र उत्पन्न आकडेवारीचे संकेत (दुसऱ्या तिमाहीतील

सणासुदीच्या काळात पेमेंटमध्ये UPI अव्वल

व्यवहार १७.८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले: बँक ऑफ बडोदा वृत्तसंस्था: सणासुदीच्या काळात युनिफाइड पेमेंट इंटरफेस

रस्त्यांच्या नियमित स्वच्छतेसाठी रस्ते दत्तक उपक्रम महापालिका राबवणार, कनिष्ठ पर्यवेक्षकांवर दोन ते तीन रस्त्यांची जबाबदारी सोपवणार

मुंबई :  मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्यांची समस्या निकालात काढण्यासाठी महापालिकेने रस्ते अभियंता

पुण्यात गोळीबार, एकाचा मृत्यू; पोलीस तपास सुरू

पुणे : कोंढवा परिसरात झालेल्या गोळीबारात गणेश काळे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. गणेश काळे हा आंदेकर टोळीशी

मोठी बातमी: सगळ्या करदात्यांना मोठा दिलासा आयटीआर रिटर्न भरण्यासाठी आयकर विभागाकडून मुदतवाढ! 

प्रतिनिधी:आयकर भरणाऱ्या करदात्यांना मोठा दिलासा सीबीडीटी विभागाने दिला आहे. माहितीनुसार, सीबीडीटी विभागाने (Central