जिल्ह्यातील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर

पालघर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव


पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले आहे. डहाणू नगर परिषदेत सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण तर महत्त्वपूर्ण अशा पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर ओबीसी अर्थात नागरिकांचा मागासवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे.


सन २०१९ मध्ये झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीच्या आरक्षणात डहाणू नगराध्यक्षपद सर्वसाधारण म्हणून आरक्षित होते. आगामी निवडणुकासाठी आता झालेल्या सोडतीत या नगर परिषदेसाठी पुन्हा सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. जव्हार नगर परिषदेत या आधी ओबीसी साधारण असे आरक्षण होते. सोमवारी निघालेल्या आरक्षणात जव्हारमध्ये सर्वसामान्य स्त्री असे आरक्षण पडले आहे. पालघर नगर परिषदेत यापूर्वी सर्वसाधारण स्त्रीचे आरक्षण होते.


आता हे आरक्षण ओबीसी अर्थात नागरिकांचा मागसवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे. दरम्यान, डहाणू, पालघर आणि जव्हार नगर परिषदेवर २०१९ मध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्यात आली होती. त्यावेळी डहाणूमध्ये भाजपचे भरत राजपूत, जव्हारमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत पटेल आणि पालघरमध्ये महाविकास आघाडीच्या डॉ. उज्ज्वला काळे निवडून आल्या होत्या. त्यानंतर आता तिन्ही नगर परिषदांचा कार्यकाळ संपल्यामुळे तिथे आता प्रशासक कार्यरत आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, प्रभागाचे आरक्षण देखील ८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे नगर परिषद क्षेत्रात नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच पाहावयास मिळणार आहे.

Comments
Add Comment

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर