संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे हे स्वत:चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे सांगावे ओरडून अशा प्रकारचे असल्याचे भारताने उघड केले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्येही पाकिस्तानने हेच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश यांनी पाकिस्तानचे वास्तव सर्वांना सांगितले. पाकिस्तान हा असा देश आहे, जो स्वतःच्या लोकांवर बॉम्ब टाकतो. तसेच आपली कृती लपवण्यासाठी जगासमोर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत राहतो, असे म्हणत पार्वथानेनी हरीश म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाच्या सायमा सलीम यांनी परिषदेत काश्मीरी महिलांच्या सुरक्षेबाबत टिपणी केली. त्या म्हणाल्या, काश्मीरी महिला अनेक दशकांपासून त्रास सहन करत आहेत. त्यांचा वापर युद्धासाठीचे शस्त्रास्त्र म्हणून केला जात आहे आणि वर्षानुवर्षे त्यांना लैंगिक हिंसाचार सहन करावा लागत आहे." या टिप्पणीवरुन भारताने पाकिस्तानला धारेवर धरले.

पाकिस्तानने आजवर फक्त जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरुन राजकारण केले आहे. मात्र आजवर भारताच्या सीमाभागावर कब्जा केल्याचे पाकिस्तान बोलत नाही. पाकिस्तानच्या सैन्याने १९७१ मध्ये ऑपरेशन सर्चलाइटमध्ये आपल्याच देशातील चार लाख महिलांवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यांची हत्या केली. तसेच आजवर पाकिस्तानने केवळ जगाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केला, असे भारताचे स्थायी प्रतिनिधि पार्वथानेनी हरीश यांनी परिषदेत सांगितले. यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानची पंचाईत झाली.

संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधीने सांगितले की महिला, शांतता आणि सुरक्षा अजेंड्यावर भारताची कामगिरी उत्तम आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यात भारताच्या डॉ. किरण बेदी यांनी पोलीस अधिकारी म्हणून केलेली कामगिरी कौतुकास्पद आणि सर्वश्रूत आहे. त्या काही काळ संयुक्त राष्ट्रांच्या पोलीस दलाच्या प्रमुख होत्या. भारताने कायमच महिलांचा सन्मान केला आहे महिलांच्या प्रगतीसाठी कार्य केले आहे. याउलट स्थिती पाकिस्तानची असल्याचे भारताने ठासून सांगितले.
Comments
Add Comment

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या