कल्याणच्या काळा तलावात झाडे तोडून साकारतोय फुड प्लाझा

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणचा ऐतिहासिक काळा तलावाचे (भगवा तलाव) स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आले होते. त्या वेळेस फुड प्लाझाची उभारणीदेखील केली होती, मात्र हा फुड प्लाझा सुरू न करता काळा तलावाच्या भोवताली असलेल्या बगिचा येथे लोखंडी फुड प्लाझा सुरू करण्याचे काम सुरु आहे. यासाठी झाडे तोडून फुड काउंटर उभारण्यात आले आहे. काळा तलाव येथे येणाऱ्या मॉर्निंग वॉकरना बगिच्यातील फुड काऊंटर व अन्य मंडळीच्या संभाव्य गर्दीला सामारे जाण्याची वेळ येणार असून पर्यावरण प्रेमींच्या मते नैसर्गिक वातावरणाचा समतोल बिघडण्यास हे फुड स्टॉल कारणीभूत ठरतील. कोणाचा फायदा करण्यासाठी प्रशासानाने बगिच्याचे सौंदर्य बिघडवित हे फुड स्टॉल उभारण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे असा सूर उमटू लागला आहे.


ज्या जागेवर नागरिक व्यायाम करतात त्या ठिकाणीदेखील स्टॉल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सकाळी संध्याकाळी येणाऱ्या नागरिकांनी वॉक आणि व्यायाम कुठे करायचा असा प्रश्न नागरिक करत आहेत. कल्याण मध्ये हा एकमेव तलाव आहे याठिकाणी रोज सकाळ संध्याकाळी हजारो लोक येतात. आधीच सोई सुविधा नाही, एक ओपन जिम आहे त्याची पण दूरवस्था झाली आहे. स्वच्छता नाही, फुड प्लाझा सुरू केले तर घाणीचे साम्राज्य पसरेल. त्यामुळे नागरिकांनी या स्टॉलला विरोध केला आहे.


पक्षीप्रेमींच्या मते या फुड स्टॉलमुळे पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासातील अन्न शृंखलेला धोका पोहोचेल, पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची संभाव्य शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने आता तरी डोळस दृष्टिकोन ठेवून फुड स्टॉल न बनवता बगिच्याचे सौंदर्य, आणि काळा तलाव परिसर हरित, सुंदर, स्वच्छ कसा राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी यानिमित्ताने जोर धरते आहे.

Comments
Add Comment

मिताली राज आणि रवी कल्पनाच्या नावांच्या स्टॅण्डचे अनावरण

विशाखापट्टणम (वृत्तसंस्था): येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गुरुवारी राज्यातील ओला, उबर सेवा बंद

कॅब-रिक्षाचालक जाणार संपावर मुंबई (प्रतिनिधी) : परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी

जिल्ह्यातील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर

पालघर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन

वसई-विरार पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

विरार (प्रतिनिधी): वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रारूप

बदलापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित

बदलापूर (वार्ताहर) : आज राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४७ नगरपालिका