रेणुका शहाणेचा ५९ वा वाढदिवस, दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा!

मुंबई : सलमान खानसोबत पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे. त्यामुळे रेणुका शहाणे यांच्यावर आज मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केले असल्याने अनेकजणांनी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


रेणुका शहाणे यांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या कामाची सुरुवात ‘हाच सूनबाईचा भाऊ’ या मराठी चित्रपटाने केली. यानंतर सुरभी या दूरदर्शनवरील मालिकेत त्यांनी निवेदिकेचे काम केले. ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. यानंतर बॉलिवूडमध्ये सलमान खानची वहिनी आणि माधुरी दिक्षितची सख्खी बहीण अशी दुहेरी भूमिका असलेला हम आपके है कौन? हा चित्रपट त्यांनी केला. ज्याने त्यांची ओळख महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. तसेच 'अपने देवर की बारात लेके लो चली मै' या त्यांच्या गाण्याने आजही महाराष्ट्रातला प्रेक्षक लग्नांमध्ये थिरकत आहे.


रेणुका शहाणे यांची आई लेखिका आणि नाट्यसमीक्षक असल्यामुळे अभिनय क्षेत्राबाबत त्यांना ओळख होती. त्यांच्या आईने लिहलेली रीटा वेलणकर या कादंबरीवर त्यांनी 'रीटा' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यामुळे त्यांची ओळख केवळ अभिनेत्री म्हणून राहीली नसून दिग्दर्शिका म्हणूनही झाली आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यातील काही कामे विशेष प्रसिद्ध आहेत.

Comments
Add Comment

कांतारा चॅप्टर १ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात जबरदस्त कमाई

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी

दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास, ओटीटीवर स्त्रीशक्तीचा उत्सव

दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास – नवरात्रीत मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीशक्तीच्या नऊ रूपांचा अल्ट्रा झकास ओटीटीवर

तुकारामांची आवली स्मिता शेवाळे ‘अभंग तुकाराम’मध्ये दिसणार

मुंबई : नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या विविध रूपांची उपासना करताना आवलीसारख्या स्त्रियांची आठवण

गायक झुबीन गर्गचे ५२ व्या वर्षी अपघाती निधन

सिंगापूर : मूळचा आसामचा असलेला लोकप्रिय बॉलिवूड गायक झुबीन गर्ग याचे ५२ व्या वर्षी निधन झाले. सिंगापूरमध्ये

सुपरस्टार अक्षय कुमारची संपत्ती किती ?

मुंबई : बॉलीवूड हे स्वप्नांचे शहर आहे, जिथे मेहनत, चिकाटी आणि अभिनयाच्या जोरावर सामान्य माणूसही सुपरस्टार बनू

अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाचे निदान