कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या गणेशाच्या बारा अवतारांचे महत्त्व

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान गणेशांचा वरदहस्त आपल्यावर टिकून राहावा म्हणून अनेक भाविक या दिवशी उपवासाचे व्रत करतात. 'संकष्टी' हा मुळात संस्कृत शब्द आहे. ज्याचा अर्थ अडचणींपासून मुक्तता असा होतो. म्हणून, या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने भक्तांना अनेक फायदे मिळतील किंवा ते कोणत्याही अडथळ्यांशिवाय आनंदी जीवन जगू शकतात असे या व्रतामागील महत्त्व सांगितले जाते. भगवान गणेश हे विद्येचे आणि कलेचे अधिपती आहेत. त्यामुळे विद्या आणि कलेची साधना करताना जर कोणाला अडचण येत असेल तर संकष्टी व्रत केल्याने त्यांची अडचणींपासून मुक्तता होते, असे बोलले जाते. याप्रमाणेच चंद्र महिन्याच्या चक्रानुसार प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा वेगवेगळ्या नावाने केली जाते. सध्या सुरू असलेल्या ऑक्टोबर महिन्यात शुक्रवारी १० तारखेला म्हणजेच हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यात संकष्टी चतुर्थी आहे. या महिन्यात वक्रतुंड महागणपतीचे व्रत केले जाते. बुद्धी वाढण्यासाठी आणि यशप्राप्तीसाठी हे व्रत महत्त्वाचे मानले जाते. बाविश्य पुराण आणि नरसिंह पुराण सारख्या वैदिक शास्त्रांमध्ये वर्षात येणाऱ्या तेरा (अधिक मासासह) संकष्टी चतुर्थी व्रताच्या महत्त्वाचे आणि नावाचे वर्णन केले आहे. त्यामुळे या महिन्याच्या संकष्टीप्रमाणे इतर महिन्यातील ११ संकष्टी चतुर्थींना गणेशाच्या कोणकोणत्या रुपाची पूजा केली जाते हे सविस्तर पाहुया...


हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्यात विकट महागणपतीच्या नावे व्रत केले जाते. विकट महागणपती हे गणपतीच्या एका अवताराचे नाव असुन गणपतीची सवारी मयूर आहे. हा अवतार कठीण किंवा विकट संकटांचा नाश करण्यासाठी घेतला जातो. कामासुर नावाच्या असुरला पराभूत करण्यासाठी गणपतीने विकट अवतार घेतला होता. चक्रराजा एकदंत हा गणपतीचा दुसरा अवतार आहे. जो वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थीला पुजला जाणारा गणपती आहे. यानंतर कृष्ण पिंगळा महागणपती हा जेष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला येणाऱ्या गणपतीचे एक रूप आहे. गणपतीचा हा अवतार कृष्ण म्हणजे गडद वर्ण आणि पिंगाक्ष म्हणजे पिंगट डोळे म्हणुन ओळखला जातो. कृष्ण पिंगळा गणपती संकष्टी चतुर्थीला भक्तांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आपली उपस्थिती लावतो असे मानले जाते.


गजानन हा गणपतीचा 'द्वापर' युगातील अवतार आहे. जो शिव-पार्वतीचा पुत्र म्हणून अवतरला. या अवताराची पूजा आषाढ महिन्यातील संकष्टीला केली जाते. तर श्रावण महिन्यात हेरंब महागणपती या अवताराची पूजा संकष्टी चतुर्थीला केली जाते. हे रुप पंचमुखी आणि दहा भुजांचे आहे. हेरंब या नावाचा अर्थ 'दीनपालक' म्हणजे दीनांचे रक्षण करणारा असा होतो. त्यामुळे या अवताराची ही पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यात विघ्नराज महागणपती या अवताराचे महत्त्व आहे.पौराणिक कथेनुसार, 'मम' नावाच्या असूराने देवतांना कैद केले होते. तेव्हा गणेश विघ्नराज रूपात प्रकट होऊन त्यांनी ममासूराचा पराभव केला आणि देवतांना मुक्त केले. त्यामुळे हा अवतार पूजला जातो. कार्तिक महिन्यात गणदीप महागणपती या अवताराची पूजा केली जाते. परब्रह्माचे प्रतीक म्हणून या अवताराची पूजा केली जाते.


पुढील महिन्यात म्हणजे मार्गशीष मध्ये अकुरथ महागणपतीला महत्त्व आहे. अकुरथ महागणपती या नावाच्या गणपतीची पूजा केल्याने वर्षभर गणपतीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. लंबोदर महागणपतीची पूजा पौष महिन्यात केली जाते. लंबोदर हे नाव विश्वाच्या विशालतेचे आणि सर्व अनुभवांना सामावून घेण्याच्या गणपतीच्या क्षमतेचे प्रतीक मानले जाते. घरात सुख-शांती, धन आणि समृद्धी येण्यासाठी माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया महागणपती या अवताराची पूजा केली जाते. तर आपले मन जितके शांत असेल तितकेच आपले कार्य चांगले होते, असे महत्त्व गणेशाच्या भालचंद्र रुपाचे सांगितले जाते. त्यामुळे आपले मन शांत राहावे म्हणुन फाल्गुन महिन्यात गणेशाच्या भालचंद्र नावाने गणेशाची पूजा केली जाते. अशाप्रकारे प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे महत्त्व वेगळे असून त्यामागील हेतु वेगवेगळा आहे.

Comments
Add Comment

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

‘मुंज्या’ मधली शर्वरी आणि अहान पांडे अ‍ॅक्शन-रोमँटिक चित्रपटात झळकणार

मुंबई : अभिनेत्री शर्वरी वाघ लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी अ‍ॅक्शन आणि रोमँटीक चित्रपटात झळकणार आहे, ज्याचे

आहारात 'या' सहा पदार्थांचा समावेश करा आणि शारिरीक स्वास्थ्य जपा!

घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आणि सतत कामाच्या व्यापात गुंतलेल्या महिलांना स्वतःच्या तब्येतीची काळजी

Airtel Business Latest News: एअरटेल बिझनेसने इंडियन रेल्वे सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (IRSOC) साठी बहु-वर्षीय करार जिंकला

एअरटेल एक ग्रीनफील्ड, बहु-स्तरीय, सायबरसुरक्षा 24x7x365 संरक्षण परिसंस्थेची रचना, बांधणी, अंमलबजावणी आणि संचालन करेल

डीपी वर्ल्डने हैदराबादची पहिली रीफर रेल फ्रेट सर्व्हिस न्हावा शेवा येथे सुरू केली

एक उपाय जो माल रस्त्यापासून रेल्वेपर्यंत नेतो आणि त्याचबरोबर खात्रीशीर जहाज कनेक्टिव्हिटी प्रदान करतो,

आधार कार्डच्या शुल्कात वाढ; नाव, पत्ता बदलण्यासाठी ७५ रुपये मोजावे लागणार

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण सेवांच्या