नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट एव्हरेस्टच्या पूर्वेकडील भागात हिमवादळामुळे हिमवृष्टी तीव्र झाली आहे. या हिमवादळामध्ये १००० गिर्यारोहक अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य करण्यात येत आहे. ४,९०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या प्रदेशातील रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांना परत येण्यासाठी पर्यायी रस्ते राहिले नाहीत. रस्त्यावर आलेला बर्फ काढण्यासाठी शेकडो स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
हिमवादळामध्ये अडकलेल्या काही पर्यटकांना आधीच वाचवण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या हिमवृष्टीमुळे तिबेटमधील माऊंट एव्हरेस्टच्या पूर्वेकडील भागात हिमवृष्टी तीव्र झाली. माउंट एव्हरेस्ट गिर्यारोहकांसाठी प्रसिद्ध आहेत. माउंट एव्हरेस्टवर ट्रेकिंगसाठी मोठ्या संख्येने गिर्यारोहक येतात. हे शिखर जगातील सर्वात उंच असून ते ८८,८४९ मीटरपेक्षा जास्त उंचीचे आहे. हे शिखर चीनमध्ये माउंट कोमोलांगमा म्हणून ओळखले जाते.