‘मुंज्या’ मधली शर्वरी आणि अहान पांडे अ‍ॅक्शन-रोमँटिक चित्रपटात झळकणार

मुंबई : अभिनेत्री शर्वरी वाघ लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी अ‍ॅक्शन आणि रोमँटीक चित्रपटात झळकणार आहे, ज्याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार असून या चित्रपटात तिच्यासोबत ‘सैयारा’ फेम अहान पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले. त्यामुळे अहान पांडे सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय जनरेशन Z अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. दुसरीकडे, शर्वरीही १०० कोटींचा गल्ला कमवणाऱ्या ‘मुंज्या’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.


या नव्या जोडीमुळे सिनेमात एक फ्रेश केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. “अहान आणि शर्वरी हे दोघे असे कलाकार आहेत ज्यांनी सिद्ध केले आहे की त्यांचा अभिनय प्रेक्षकांना थिएटरकडे खेचू शकतो.”


मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा मूळ गाभा प्रेमकथेचा असला तरी त्यात भरपूर अ‍ॅक्शन असणार आहे,जो तरुण वर्गाला आकर्षित करेल. “अली अब्बास जफर सारखा अनुभवी दिग्दर्शक आता नव्या दमाच्या कलाकारांसह एक फ्रेश आणि आधुनिक शैलीचा चित्रपट घेऊन येतोय,”


हा एक अ‍ॅक्शन-रोमान्स चित्रपट असणार आहे. सध्या या प्रोजेक्टचं. सध्या या प्रोजेक्टचं अधिकृत शीर्षक जाहीर करण्यात आलेलं नाही. हा चित्रपट आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या सहकार्याचा पाचवा प्रकल्प ठरणार आहे. याआधी त्यांनी "मेरे ब्रदर की दुल्हन", "गुंडे", "सुलतान" आणि "टायगर जिंदा है" यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.


या नवीन जोडीची घोषणा होताच, सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठा उत्साह दाखवला आहे. शर्वरी आणि अहानला एकत्र स्क्रीनवर पाहण्याची उत्सुकता वाढली असून, अनेकांनी फायर इमोजी वापरून या जोडीला भरभरून पाठिंबा दर्शवला आहे.


या दोघांचे कोणतेही एकत्र फोटो किंवा व्हिडीओ अजूनपर्यंत बाहेर आलेले नाहीत, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Comments
Add Comment

अलविदा ही मॅन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी