नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तत्काळ करा
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याची चिंता निर्माण झाली आहे. मात्र अजूनपर्यंत नुकसानीचे पंचनामे केले जात नाहीत, अशी तक्रार शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडे ग्रामस्थांनी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून जयंत पाटील यांनी तहसीलदार विक्रम पाटील यांच्याशी संपर्क साधत नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याची मागणी केली.
अलिबाग (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास विमान उडू देणार नाही, असा थेट इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला आहे. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव उद्घाटनाच्या दिवशीच जाहीर करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
अलिबाग येथील शेतकरी भवन येथे शनिवारी (दि. ४) विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी शेकाप नेते पाटील बोलत होते. बैठकीस शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस अॅड. गौतम पाटील, सदस्य अनिल पाटील, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेतकरी सभा अध्यक्ष अनिल गोमा पाटील, अॅड. विजय पेढवी, संजय पाटील आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेएनपीटी प्रकल्प उभारताना साडेबारा टक्के जमीन दिली जाणार असे आश्वासन देण्यात आले होते; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. नवी मुंबई विमानतळासाठी परिसरातील १२ हून अधिक गावे उठविण्यात आली आहेत. प्रकल्पग्रस्तांसह स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार देणार या आश्वासनावर प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या आहेत. या विमानतळावर हजारोंची भरती केली जाणार असून, ८० टक्क्यांहून अधिक भरती स्थानिकांची होणे गरजेचे आहे.
नवी मुंबईसह पनवेल व जिल्हयामध्ये अनेक तरुण-तरुणी उच्चशिक्षित आहेत. त्यांना विमानतळावर नोकरी मिळाली पाहिजे ही शेकापची भूमिका आहे. याबाबत मनसे नेते राज ठाकरे यांच्यासोबतही बैठक झाली. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आदी पक्षातील नेते मंडळींसोबत बैठक घेऊन आंदोलनाची भुमिका आणि दिशा ठरविली जाणार असल्याचेही पाटील म्हणाले.