'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना वगळण्यासाठी शासनाने अनेक चाळण्या लावल्या आहेत. त्यानुसार आता प्रत्येक लाभार्थी महिलेने केवायसी करायची आहे. त्यासाठी लाभार्थ्यांसोबत पती किंवा वडिलांचीही ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याद्वारे महिला लाभार्थ्यासोबत तिचा पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न शोधले जाणार आहे.


लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास तिला लाभासाठी अपात्र ठरवले जाणार आहे. योजनेची सुरुवात झाल्यापासून नियमितपणे महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत आहेत. सरकारवर आर्थिक बोजा वाढल्याने विविध नियम लावून लाभार्थ्यांच्या संख्या कमी करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.


यासाठी योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. तसेच दोन महिन्यांत ही प्रक्रिया केली नाही, तर योजनेचा लाभ बंद होणार आहे.


पण अनेक महिलांना केवायसीमध्ये तांत्रिक अडथळे येत असल्याचा अनुभव आहे. सर्व्हर ठप्प होत असल्याची व ओटीपी मिळत नसल्याची समस्या महिलांना भेडसावत आहे. यामुळे 'लाडक्या बहिणी' भडकल्या आहेत. केवायसी करताना 'लाडक्या बहिणींना ओटीपी येत नाही.  यामुळे सेतू केंद्रांवर गर्दी वाढली  आहे. तासनतास रांगेत थांबूनही कामं होत नसल्याने महिलांचा संताप अनावर झाल्याचे दिसून येते.



मुदतवाढ मिळणार?


ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांत केवायसी करता येणार आहे. मात्र केवायसी करण्यात अडचणी येत असल्याने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. केवायसीवेळी ओटीपी मिळत नसल्याच्या समस्येची दखल महिला व बालविकास विभागाने घेतली आहे.


तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतिपथावर आहे, असा खुलासा या विभागाने केला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पोर्टल सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.



...अशी आहे योजनेची केवायसी प्रक्रिया


https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. पोर्टलवर नाव, पत्ता, शिधापत्रिका क्रमांक, आधार क्रमांक, उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल. 'कॅप्चा' नोंदविल्यानंतर सहमती दर्शवावी लागेल. त्यानंतर ओटीपी येतो. मात्र, सर्वर काम करीत नसल्याने ओटीपी येणे बंद झाले आहे.

Comments
Add Comment

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत