मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच दृष्टीने आता मुंबईमध्ये वाहतूक सुविधा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. येत्या ८ तारखेल पीएम मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो, ही सर्व तिकिट्स एकाच ऑपवर उपलब्ध होणार आहेत. तसेच, एकाच कार्डवरून उपलब्ध होणार आहे.
रोजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक जण घराबाहेर पडून आपापली कामे करत असतो. बेस्ट, ट्रेन, मेट्रो, बस, यांचा रोजच वापर करत असतो. या सर्वांची तिकिट काढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं. पण आता मुंबईकरांची चिंता मिटणार आहे. कारण, सर्व तिकिट एकाच ठिकाणी मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एकात्मिक तिकीट प्रणाली अंतर्गत "मुंबई १ स्मार्ट कार्ड" आणि "मुंबई १ अॅप" ही माध्यमे लवकरच सुरू होणार आहे. या अॅप आणि कार्डची उत्सुकता अनेक जणांना होती.
'एमएमआरडीए'च्या दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो-२ अ आणि दहिसर-गुंदवली मेट्रो-७ मार्गिकांसाठी तयार केलेल्या 'मुंबई-१ कार्ड'मध्येच बदल करून 'मुंबई-१ स्मार्ट कार्ड' तयार करण्यात आले आहे. हे कार्ड 'मेट्रो-२ अ', 'मेट्रो-७', 'मेट्रो-१', मेट्रो-३', मोनोरेल, बेस्ट, उपनगरीय रेल्वे, एसटी प्रवासासाठीही चालणार आहे.
८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळ आणि कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मेट्रो-३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक-कफ परेड टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. बीकेसीत होणाऱ्या या कार्यक्रमात 'मुंबई १ कार्ड' आणि 'मुंबई १ अॅप'चे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.